आणीक या काळे न चले उपाय । धरावे ते
पाय विठोबाचे ।।
अवघेची पुण्य असे तया पोटी । अवघिया तुटी
होय पापा ।।
अवघे मोकळे अवघिया काळे । उद्धरती कुळे
नरनारी ।।
काळ वेळ नाही गर्भवास दुःखे । उच्चारिता मुखे
नाम एक ।।
तुका म्हणे काही नलगे सांडावे । सांगतसे भावे
घेती तया ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!