उचित ते काय जाणावे दुर्बळे । थोरिवेचे काळे तोंड देवा ।। देतो हाका कोणी नायकती द्वारी । ओस कोणी घरी नाही ऐसे ।। आलिया अतीता शब्दे समाधान । करिता वचन काय वेचे ।। तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजरी नाही ऐसी ।।
स्तुती
No comments yet. Be the first to comment!
Comments
No comments yet. Be the first to comment!