कोण पर्वकाळ पाहासील तीथ । होते माझे
चित्त कासावीस ।।
पाठवी भातुके प्रेम झडकरी । नको राखो
उरी पांडुरंगा ।।
न धरावा कोप मजवर काही । अवगुणी अन्यायी
म्हणोनियां ।।
काय रडवीसी नेणतीया पोरां । जाणतिया थोरांचिये
परी ।।
काय उभी कर ठेवूनिया कटी । बुझावी धाकुटी
लडिवाळे ।।
तुका म्हणे आता पदरासी पिळा । घालोनि निराळा
नव्हे मग ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!