पढियंते आम्ही तुजपाशी मागावे । जीवींचे सांगावे
हितगुज ।।
पाळशील लळे दिन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे
जननिये ।।
जीवभाव तुझ्या ठेवियेला पायी । तूंचि सर्वां ठायी
एके आम्हां ।।
दुजियाचा संग लागू नेदी वारा । नाही जात
घरा आणिकांच्या ।।
सर्व सत्ता एकी आहे तुजपाशी । ठावे आहे देसी
मागेन ते ।।
म्हणउनि पुढे मांडियेली आळी । थिंकोनिया चोळी
डोळे तुका ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!