तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी या पृथ्वीलोकात, या इहलोकात याच कारणासाठी आलो आहोत, म्हणजे या एकाच कारणासाठी आलो आहोत आणि ते म्हणजे आपल्या संत-सज्जनांनी, पूर्वी होऊन गेलेल्या साधू-संतांनी जे सांगितले आहे ते खऱ्या भावाने आचरण करून दाखवण्यासाठी. जे ते बोलून गेले आहेत ते साचभावाने वर्तन करण्यासाठी. जेणेकरून त्यातून इतरांना देखील मार्गदशन मिळेल व त्यांना स्वहिताचा मार्ग देखील सापडेल.
कारण ते म्हणतात जेव्हा आम्ही येथे आलो, तेव्हा पाहतो तर काय येथे सर्व जग रिकामे पडले असून सर्वजण आडरानात जाऊन वस्ती करू लागले आहेत. त्यांनी सरळसोट जाण्याचा मार्ग व पर्याय केव्हाच सोडून दिला आहे. त्यांचे नको नको त्या कामात हात गुंतले आहेत. निषिद्ध कर्मांनांच ते स्वधर्म समजू लागले आहेत. आणि तसे करण्यातच त्यांना धन्यता वाटू लागली आहे.
म्हणजेच त्यांनी सरळसोट मार्गाने जाणे केव्हाच सोडून दिले आहे आणि आडमार्गाने जाणेच त्यांना पसंत पडू लागेले आहे. एवढेच नव्हे तर त्यातून पुनरूपी कसे बाहेर पडावे हे कित्येकांना आता ठाऊकच नसल्याने ते सर्वजण आता त्यातच गुंतून पडले आहेत आणि त्यांना खऱ्या उद्दिष्टाचा देखील विसर पडला आहे.
तुकोबा म्हणतात अशांना कित्येक काळ कोणीही वाली न उरल्याने वा मार्गदर्शक न राहिल्याने हे असे घडून आले आहे.
त्यामुळे पूर्वी संतांनी दाखवलेली वाट आता ओसाड पडली आहे. त्याचा कित्येक युगे कोणीही वा...
Read More

त्यामुळे पूर्वी संतांनी दाखवलेली वाट आता ओसाड पडली आहे. त्याचा कित्येक युगे कोणीही वापर करत नसल्याने किंबहुना त्याचा केव्हाच त्याग झाल्याने ती धुळीने माखली गेली आहे. त्यावर पालापाचोळयांचा थर जमला असून ती आता दिसेनाशीच झाली आहे.
तेव्हा आम्ही आता पहिले काम हे करू की संत ज्या मार्गाने चालत गेले ती धोपट वाट, तो सरळसोट मार्ग आधी झाडून पुसून स्वच्छ करू आणि सर्वांसाठी ती खुली करू. एवढेच नव्हे तर, ती इतरांना आपल्याकडे कशी खुणावेल, कशी आकर्षित करेल हे देखील पाहू.
म्हणजेच संतांचे शेष उरलेले काम यापुढे आम्ही पूर्ण करू. आम्ही ते पूर्णत्वास नेऊ. आणि त्यासाठी आम्हीच त्यांच्याकडून आधी प्रेरणा घेऊ.
त्यासाठी आम्ही संतांच्या उच्छिष्टाचे सेवन करू, म्हणजेच त्यांच्याकडून आम्हीच आधी स्वयं प्रेरित होऊन तसे वर्तन आणि आचरण करू व इतरांना देखील तसे करण्यास प्रवृत्त करू.
एवढेच नव्हे तर संत पूर्वी ज्या मार्गाने चालत वैकुंठि गेले, आम्ही देखील त्याच मार्गाने जाऊन इतर देखील आमच्या मागे कसे येतील ते पाहू. आमच्या आचरणातून, वर्तनातून ते कसे प्रेरित होतील हे पाहू.
ते पुढे म्हणतात, एवढेच नव्हे तर, अशा या लोकांनी आपल्या स्वार्थासाठी परमार्थाच्या ग्रंथांची देखील नासधूस केली आहे. त्याची देखील विल्हेवाट लावली आहे. गाठीशी काहीही अनुभव नसतान केवळ मानासाठी, मोठेपणासाठी संतांनी लिहून ठेवलेल्या शास्त्रे, पुरणांची देखील विटंबना केली आहे. हेच नहे तर त्यांचा गैरवापर देखील केला आहे.
संतांनी सांगितलेला त्यातील खरा अर्थ न कळल्याने तो पुसून वा खोडून टाकून आणि त्यात छेडछाड केली आहे. स्वतःच्या वैयक्तिक लभासाठी तेथे नवीन अर्थे जोडला असून व तोच खरा म्हणून सर्वत्र पसरविला आहे. व स्वतःस ज्ञानी म्हणून संबोधून घेऊ लागले आहेत.
परंतु अशांना तुकोबा ब्रह्मज्ञानी नव्हे तर केवळ शब्दज्ञानी म्हणून संबोधितात. त्यांच्यावर टीकास्त्रे सोडतात.
ते म्हणतात कारण अशा ह्या शब्दज्ञानी लोकांनी आपल्याच पारमार्थिक ग्रंथ आणि पुराणांचा शिरच्छेद केला, त्यांचा संपूर्ण नायनाट केला. आणि केवळ आणि केवळ विषय लोभाने भरलेल्या या लोकांनी निव्वळ स्वार्थासाठी, स्वहितासाठी उपलब्ध असलेल्या उरल्या-सुरल्या साधनांचा देखील विनाश घडवून आणला. ज्यामुळे मग स्वहितासाठी असलेली सर्वच साधने लोप पावली.
त्यामुळे अशा या लोकांना पुनःरूपी भानावर आणण्यासाठी वा वाट चुकलेल्यांना पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी आम्ही सर्वांना पुन्हा भक्तीचा मार्ग दाखवू. त्यासाठी भक्तीचा डांगोराच पीटू. जी वाट भक्ताला केवळ योग्य मार्गावरच आणत नाही तर आशेचा नवीन किरणही दाखवते. आणि वर कळीकाळापासून देखील त्यांचे संरक्षण करते.
किंबहुना कळीकाळासाठी असा हा भक्तीपंथ एक दराराच असतो. ज्यामुळे केवळ व्यसने, विकार यांपासूनच नव्हे तर अकाली मरण वगैरे गोष्टींपासून देखील भक्ताचे संरक्षण करते.
त्यामुळे येथील सर्वांना भक्तीचे आवाहन करत ते शेवटी म्हणतात यापुढे भिण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही सर्वांनी आता केवळ आनंदाने जयजयकार करा. न घाबरता, न भिता त्या एका श्रीहरिच्या नामाचा जयघोस कर. व आनंदाने आमच्या मागे या. आम्ही जी वाट तुम्हास दाखवू ती चोखाळा आणि जितक्या शक्य तितक्या लवकर स्वतःचे हित पदरी पाडून घ्या व स्वतःचा उद्धार करा.
अभंग २२२
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!