कास घालोनी बळकट । झालो कळिकाळावरी नीट ।केली पायवाट । भवसिंधूवरुनि
।।
या रे या रे लहान थोर । याति भलते नारी नर ।करावा विचार । न लगे
चिंता कोणाची ।।
कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथे जमे । लाविले दमामे । मुक्ता आणि मुमुक्षा । एकंदर शिक्का । पाठविला याही लोका ।आलो म्हणे तुका । मी नामाचा
धारक ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!