Published on: 02 Jul 2026, 07:58 AM
परिस्थिती / संदर्भ:
ध्यानी योगीराज बैसले कपाटी । लागे पाठोवाटी
तयांचिया ।।
तान भूक त्याचे राखे शीत उष्ण । झाले उदासीन
देहभाव ।।
कोण सखे तया आणिक सोयरे । असे त्या
दुसरे हरिविण ।।
कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाही राज्यमद
घडी तया ।।
तुका म्हणे विष अमृतासमान । कृपा नारायण
करिता होय ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!