Published on: 08 Aug 2026, 07:55 AM
परिस्थिती / संदर्भ:
देव आड जाला । तो भोगिता मी उगला ।अवघा निवारला । शीण
शुभाअशुभाचा ।।
जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें ।कैचीं येथें लोकें । हा आभास
अनित्य ।।
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग ।वांटिले विभाग । वर्णधर्म हा
खेळ तयाचा ।।
अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न ।वेदपुरुष नारायण । तेणें केला
निवाडा ।।
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस ।पायापाशीं वास । निकट नव्हे
निराळा ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!