ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु ।जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी
तीर्थ वंदूं रे ।।
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्ति भेदु।भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम
करीं बंधु रे ।।
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी
थोरी रे ।।
अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती
तया अवचिता रे ।।
मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो
विटला जाणीवेस रे ।।
ब्रह्मज्ञान लाभण्यासाठी काय करावे
Comments
No comments yet. Be the first to comment!