अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक । तरि का हे
पाक घरोघरी ।।
आपुलाले तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य
राम राम ।।
देखोनी जीवन जरि जाय तान । तरि का
साठवण घरोघरी ।।
देखोनिया छाया सुख न पाविजे । जंव न बैसीजे
तया तळी ।।
हित तरी होय गाता आईकता । जरि राहे चित्ता
दृढ भाव ।।
तुका म्हणे होसी भावेचि तू मुक्त । काय वारिशी
युक्त जाणीवेची ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!