तुकाराम महाराज म्हणतात हे देवा विठ्ठला, हे नारायणा तू स्वतःच एक धर्माची मूर्ती आहेस आणि पाप-पुण्य हे देखील सर्वस्वी तुझ्याच हाती आहेत. त्यामुळे त्या जोरावर तू येथे कोणालाही, अगदी कोणालाही त्यांच्या त्यांच्या पापातून सोडवू शकतोस, त्यांच्या कर्मातून मुक्त करू शकतोस, हे आता मला चांगलेच ठाऊक झाले आहे.
त्यामुळे माझ्या दुस्तर कर्मापासून देखील तू माझी सुटका करावीस आणि त्यापासून मला सोडवावेस अशी माझी तुला विनंतीच आहे. किंबहुना अशी मी तुला गळच घालतो आहे.
ते पुढे म्हणतात एवढेच नव्हे तर अशा या माझ्या प्रारब्धातुन, माझ्या दुस्तर अशा कर्मातून माझी सुटका करवून तू माझा संपूर्ण अंगीकार देखील कारावास अशी देखील माझी इच्छा आहे.
कारण तू बहुतेकांचा भार स्वतःच्या शिरी घेतोस आणि तो चांगलाच वाहतोस ह्या ज्ञानाची देखील मला चांगलीच उपरती झाली आहे. त्यामुळे त्यात माझे भाराचे तुला काय जड वाटणार आहे?
म्हणजेच तू जर माझा अंगिकार केलास, माझा संपूर्ण स्वीकार करून माझा सर्वभार स्वतःच्या शिरी घेतलास तर तुझे त्याने काय बिघडणार आहे? त्याने तुझ्या सर्वशक्तिपणाला कोणता धोका निर्माण होणार आहे?
तुकोबाराय शेवटी म्हणतात त्यामुळे हे देवा पांडुरंगा, हे सर्व जीवांच्या जीवना माझी देखील ही इच्छा, ही विनंती तू मान्य करावीस असे मी मी तुला गाऱ्हाणेच घालत आहे असे समज.
किंबहुना आता अंतापर्यंत, माझ्या अगदी शेवटच्या श्वासापर्य...
Read More

किंबहुना आता अंतापर्यंत, माझ्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझे तुझ्याकडे आता हेच एक मागणे असेल आणि ते तू पूर्ण करावेस अशी माझी तुला कळकळीची विनंतीच आहे.
अभंग १८
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!