← मागील अभंग (173)
पुढील अभंग (175) →

त्याग म्हणजे काय?

Published on: 30 Sep 2025, 06:52 AM

परिस्थिती / संदर्भ:

कोणत्याही कर्तव्याचे विधीने सेवन केले असता ते मग त्यागासमानच गणले जाते व त्याचे फळ देखील उचित असेच मिळते...

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १७४


विधीने सेवन । विषय त्यागाते
समान ।।
मुख्य धर्म देव चित्ती । आदि अवसान
अंती ।।
बहु अतिशय खोटा । तर्के होती
बहु वाटा ।।
तुका म्हणे भावे । कृपा करीजेते
देवे ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात येथे कर्तव्य म्हणून केलेली कोणतीही गोष्ट अथवा कर्म हे त्यागासामान असून मग त्याचे फळ देखील मनुष्याला कर्म कर्तव्यात बांधू शकत नाही.
ते म्हणतात हा नीतिनियम विषयांच्या सेवनाला देखील मग लागू पडतो.
म्हणजेच मनुष्य जेव्हा कर्तव्य म्हणून विषय कर्म आचरतो अथवा विधीने वा नीतिनियमाने त्यांचे सेवन करतो तेव्हा असे कर्म देखील मग त्यागासमानच होते आणि त्यास त्याचे उचित असेच फळ मिळते...
विधीनुसार किंवा शास्त्रानुसार विषयांचे सेवन केले असता विषय देखील मनुष्याला मग त्यागाचीच भावना देतात आणि त्यापासून त्यांना त्यागाचेच फळ मिळते, कारण ते विषयसुख न राहता ते त्यागासमान गणले जाते.
ते म्हणतात माणसाचा मुख्य धर्म हा देवाचे चिंतन करणे हा आहे.
म्हणजेच जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, म्हणजेच आदी, अंती आणि अवसानी(म्हणजे भान असताना) देवाचे चित्तात ध्यान करणे, त्याची सदैव आठवण ठेवणे हाच मनुष्याचा मुख्य धर्म असून त्याने त्याविषयी नित्य जागरूक असावे.
परंतु तसे न करता तो ह्याविषयी जर मनी शंका-कुशंका घेत राहील, किंवा हरिचिंतन आणि हरिभजनाविषयी त्याची बुद्धी तर्क-वितर्क करीत राहील तर त्यापासून अनेक फाटे फुटून तो मग नको त्या मार्गांकडे भरकटत जाईल.
तुकोबाराय शेवटी म्हणतात म्हणूनच मनुष्याने मनी देवाविषयी सतत भक्तिभाव ठेवावा, त्याविषयी जाण असू द्यावी, त्याला मनोभावे भजावे आणि असे झाले की मग दे... Read More
← मागील अभंग (173)
पुढील अभंग (175) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!