एक तटस्थ मानसी । एक सहजची
आळसी ।।
दोन्ही दिसती सारखी । वर्म जाणे
तो पारखी ।।
एक ध्यानी करिती जप । एक बैसुनी
घेती झोप ।।
एका सर्वस्वाचा त्याग । एका पोटासाठी
जोग ।।
एका भक्ती पोटासाठी । एका देवासवे
गाठी ।।
वर्म पोटी एका । फळे दोन
म्हणे तुका ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!