अरे हे देह व्यर्थ जावे । ऐसे जरी तुज व्हावे ।द्युत्कर्म मनोभावे । सारीपाट
खेळावा ।।
।। मग कैचे हरीचे नाम । निजेलिया जागा राम ।जन्मोजन्मीचा अधम । दुःख थोर
साधिले ।।
विषयसुखाचा लंपट । दासीगमनी अतिधीट ।तया तेचि वाट । अधोगती
जावया ।।
आणिका एक कोड । नरका जावयाची चाड ।तरी संतनिंदा गोड । करी कवतुके
सदा ।।
तुका म्हणे ऐसे । मन लावी रामपीसे ।नाही तरी आलिया सायासे । फुकट जासी
ठकोनी ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!