← मागील अभंग (155)
पुढील अभंग (157) →

अभंग क्रमांक: 156


शास्त्रांचे जे सार वेदांची जो मूर्ती । तो आम्हा सांगाती
प्राणसखा ।।
म्हणउनी नाही आणिकांचा पांग । सर्व जाले सांग
नामे एका ।।
सगुण निर्गुण जयाची हि अंगे । तोचि आम्हा संगे
क्रीडा करी ।।
तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आयते
केले नव्हो ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात असा हा सर्व शास्त्रांचे सार असलेला आणि चारही वेदांची रचना करणारा हा विठ्ठलच आता आमचा सखा किंबहुना प्राणसखा झाला आहे, आमचा सोबती झाला आहे. त्यामुळे आम्हांला आता इतर कोणाचीही आस उरलेली नाही.
आणि हे देखील केवळ त्याच्या नामामुळे शक्य झाले. म्हणजेच असे हे त्याचे हे नाम आम्ही उराशी सतत बाळगल्याने आणि सदैव कंठी ग्रहण केल्यानेच हे शक्य झाले.
आणि एवढेच नव्हे तर अशा ह्या त्याच्या नामामुळे केवळ तोच नव्हे नव्हे तर इतर सर्वचजण देखील आता आमचे सोबती झाले आहेत.
आणि हे कमी म्हणून की काय, ज्याची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रुपे आहेत, जो आकलनातीत, परातीत आहे तो आमच्या सोबत रोज क्रीडा देखील करतो, खेळतो, आमचे मनोरंजन करतो. आणि जीवाला जीव देणाऱ्या एखाद्या मित्राप्रमाणे आमच्या सदैव पाठीशी असतो. सर्व परिस्थितीत आमचे सहाय्य करतो. अ शारीतीने सतत आमच्या सोबतच असतो.
त्यामुळे आम्हाला आता इतर कोणाच्याही मैत्रीची गरज भासत नाही.
ते शेवटी म्हणतात त्यामुळे आम्हीच आता आमच्या विधीचे जनिते झालो असून आम्ही स्वयंभूच झालो आहोत. आणि ही स्थिति आम्हीच आमच्या कर्मामुळे प्राप्त केली आहे. आमच्या पुण्याच्या जोरावर आम्हीच या पदाला गवसणी घातली आहे.
आम्हाला हे पद, ही अवस्था आयती मिळाली नसून आम्ही स्वतःच ती आमच्या हाताने आम्ही घडवली आहे.
म्हणजेच या पदावर आम्हाला कोणीही आणून आयते बसविलेले नाही. आम... Read More
← मागील अभंग (155)
पुढील अभंग (157) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments
Yogita Chavan (2025-07-22 09:17:36)

ram!

Yogita Chavan (2025-07-22 09:12:18)

खूपच छान!