अभंग क्रमांक: १५२
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान
इच्छा ते ।।
मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।मने इच्छा पुरविली । मन माउली
सकळांची ।।
मन गुरु आणि शिष्य । करी आपुलाचे दास्य ।प्रसन्न आपआपणास । गती अथवा
अधोगती ।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।नाही नाही आन दैवत । तुका म्हणे
दुसरे ।।
अर्थ:
जगाचा त्याग का करावा भक्ती करण्याचा मी उपदेश का करतो: लोकांना उद्देशून: तुमच्या भल्यासाठी, तुमचे हित घडून यावे यासाठी आम्ही तुम्हांस उपदेस करत आहोत, याखेरीज आम्हांला कसलीही चाड नाही...
Read More
जगाचा त्याग का करावा भक्ती करण्याचा मी उपदेश का करतो: लोकांना उद्देशून: तुमच्या भल्यासाठी, तुमचे हित घडून यावे यासाठी आम्ही तुम्हांस उपदेस करत आहोत, याखेरीज आम्हांला कसलीही चाड नाही
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!