दिवट्या वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण
दिली हातीं ।।
नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा
पाद्याचें ।।
गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं
ठेवूं नका ।।
करूं द्यावें न्हावें वरें । ठायीचें कां रे
न कळे चि ।।
वर्हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका
तेलीं ।।
तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका
सामग्री ।।
अधर्म करू नये, त्याने अहितच साधले जाते, पाप पदरी येते, नरक जोडला जातो.. आणि देव अंतरतो
Comments
No comments yet. Be the first to comment!