हाती होन दाविती बेना । करिती लेकीच्या
धारणा ।।
ऐसे धर्म झाले कली । पुण्य रंक
पाप बळी ।।
सांडिले आचार । द्विज चाहाड
झाले चोर ।।
टिळे लपविती पातडी । लेती विजारा
कातडी ।।
बैसोनिया तक्ता । अन्यायेंविण पीडिती
लोका ।।
मुदबख लिहिणे । तेलतूपसाबण
केणे ।।
निचाचे चाकर । चुकलिया खाती
मार ।।
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी
तोडी ।।
वैश्य शूद्रादिक । हे तो सहज
नीच लोक ।।
अवघा बाह्य रंग । आत हिरवे
वरी सोंग ।।
तुका म्हणे देवा । काय निद्रा
केली धावा ।।
अधर्म करू नये, त्याने अहितच साधले जाते, पाप पदरी येते, नरक जोडला जातो.. आणि देव अंतरतो
Comments
No comments yet. Be the first to comment!