← मागील अभंग (126)
पुढील अभंग (128) →

अभंग क्रमांक: १२७


केला मातीचा पशुपति । परि मातीसि
काय महती ।
शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी
सामावे ।।
तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो
भगवंत ।
आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको
आम्हांस ।।
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे
विष्णु ।
विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे
पाषाणरूपें ।।
केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे
अंबा ।
पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे
कांसेंपणें ।।
ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली
कांजी ।
ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आम्ही पाषाणरूप
राहणें ।।

अर्थ:
आम्हांला आता संत पूजतात परंतु ते सर्व देवाला प्राप्त होते, आम्ही विष्णुदास केवळ निमित्त आहोत... Read More
← मागील अभंग (126)
पुढील अभंग (128) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!