← मागील अभंग (125)
पुढील अभंग (127) →

अभंग क्रमांक: १२६


चवदा भुवने जयाचिया पोटी । तोचि आम्ही
कंठी साठविला ।।
काय एक उणे आमुचिया घरी । वोंगळती द्वारी
रिद्धी सिद्धी ।।
असुर जयाने घातले तोरडी । तो आम्हासी जोडी
कर दोन्ही ।।
रूप नाही रेखा जयासी आकार । आम्ही तो साकार
भक्ती केला ।।
अनंत ब्रह्मांडे जयाचिये अंगी । समान तो
मुंगी आम्हासाठी ।।
तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी । झालो हे निराळी
ठेवुनी आशा ।।
चौदा भुवने ज्याच्या ठायी एकवटली आहेत तो माझ्या कंठी विराजमान आहे (नामस्मरणा मुळे ). आमच्या घरी कसल्याही गोष्टीची कमतरता नाही कारण आमच्या दारात रिद्धी आणि सिद्धी वास करीत आहेत. ज्याने असुराचा बळी घेतला तो आम्हापुढे दोन्ही हाथ जोडून उभा आहे. ज्याला रूप आणि आकार नाही आहे त्या निराकाराला आमच्या भक्तीमुळे साकार व्हावे लागले. ज्याच्या अंगी अनंत ब्रह्मांडे भरून आहेत तो आमच्यासमोर एखाद्या मुंगीप्रमाणे आहे.

अर्थ:
भक्ती केल्याचा परिणाम... Read More
← मागील अभंग (125)
पुढील अभंग (127) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!