← मागील अभंग (127)
पुढील अभंग (129) →

अभंग क्रमांक: १२८


ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती
विठोबाचे ।।
येरा मान विधी पाळणापुरते । देवाची ती
भुते म्हणोनिया ।।
सर्वभावे जाला वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या
आस उच्छीष्टाची ।।
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास । तैसी नाही
आस आणिकांची ।।

अर्थ:
तुकोबा म्हणतात आता यापुढे मलाच तेच माझे सखे सोयरे वाटतात जे विठोबाचे खऱ्या अर्थाने दास झाले आहेत, त्याचे सेवेकरी आहेत, जे सदैव त्याचे नामस्मरण करतात अथवा वेळोवेळी ज्यांना त्याच्या पायाची आठवण होते.
तसे पाहू गेल्यास, एरव्ही मी इतर लोकांनाही मान देतो, त्यांचा देखील आदर-सत्कार करतो, परंतु तो केवळ विधी पाळण्यापुरता मर्यादित असतो. कारण या भुतलावरील ती देखील देवाची भुते आहे म्हणून. म्हणजेच त्यांच्यात देखील देवाचा वास आहे म्हणून.
परंतु एरव्ही तुम्ही मला विचाराल तर जे खऱ्या अर्थाने आणि सर्वभावाने वैष्णवांचे दास आहेत, त्यांचे सेवेत रुजू आहेत, तेच माझे खरे सखेसोयरे असून तेच मला जवळचे वाटतात आणि त्यांच्याच उच्छीष्टाचीमी मी राहून राहून अपेक्षा करतो. किंबहुना मी तर असे म्हणेन की ज्याप्रमाणे मला हरीदास आवडतात अथवा प्रिय आहेत, त्याप्रमाणे मला आता इतर जन आवडत नाही. म्हणजेच एक विष्णुदास सोडून या जगी मला अन्य कोणाचीही आस नाही वा कोणाचीही चाड नाही.
उच्छीष्टाची =उष्ट्या जेवणाची ... Read More
← मागील अभंग (127)
पुढील अभंग (129) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!