तुकाराम महाराज देवाला उद्देशून म्हणतात हे देवराया, हे पतितपावना येथे मनुष्य संसारात येऊन कष्ट उपसतो, कामधंदा करतो, त्याद्वारे लौकिक कमावतो, नाव आणि प्रतिष्ठा कमावतो, परंतु काहीकेल्या ते त्याला टिकवून मात्र धरता येत नाही.
कारण ते म्हणतात ह्या संसारात लोकं दोन्ही बाजूने बोलतात व मनुष्याला हैराण करून सोडतात. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांच्या कसोटीला खरे उतरणे मनुष्याला कठीण होऊन बसते व नेमके या समाजात कसे वागावे हे देखील मग त्यास कळेनासे होते.
परंतु तुकोबा म्हणतात शहाण्याने मात्र कधीही जनाचे ऐकू नये. त्यांचे बोल देखील मनाला लावून घेऊ नये. किंबहुना त्या भानगडीत पडूच नये आणि लोक काय बोलतील ह्याला महत्व देऊ नये.
ते म्हणतात जो कोणी येथे नेटाने संसार करतो त्याला हे लोकं दोषी म्हणतात, 'आकंठ संसारात बुडालेला असतो' असे म्हणतात तर दुसरीकडे तो न करणाऱ्याला मात्र आळशी म्हणतात, हा पोटपोसा असून ह्याला फक्त स्वतःच्याच पोटाची चिंता आहे, ह्यास जबाबदारी नको असून केवळ स्वतःचेच पोट कसे भरावे एवढेच हा जाणतो असे म्हणून त्याला हिणवतात.
तसेच कोणी आचाराला धरून संसार वाढविला असता ह्याने किती पसारा वाढवून ठेवला आहे असे म्हणतात आणि तसे न केल्यास मात्र हेच लोक त्याची निंदा करण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत.
तसेच जो संतसंगतीला लागतो, त्यांच्या सानिध्यात राहतो त्याला उपदेशी म्हणतात. त्यांच्या सानिध्यात राहून ह...
Read More
तुकाराम महाराज देवाला उद्देशून म्हणतात हे देवराया, हे पतितपावना येथे मनुष्य संसारात येऊन कष्ट उपसतो, कामधंदा करतो, त्याद्वारे लौकिक कमावतो, नाव आणि प्रतिष्ठा कमावतो, परंतु काहीकेल्या ते त्याला टिकवून मात्र धरता येत नाही.
कारण ते म्हणतात ह्या संसारात लोकं दोन्ही बाजूने बोलतात व मनुष्याला हैराण करून सोडतात. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांच्या कसोटीला खरे उतरणे मनुष्याला कठीण होऊन बसते व नेमके या समाजात कसे वागावे हे देखील मग त्यास कळेनासे होते.
परंतु तुकोबा म्हणतात शहाण्याने मात्र कधीही जनाचे ऐकू नये. त्यांचे बोल देखील मनाला लावून घेऊ नये. किंबहुना त्या भानगडीत पडूच नये आणि लोक काय बोलतील ह्याला महत्व देऊ नये.
ते म्हणतात जो कोणी येथे नेटाने संसार करतो त्याला हे लोकं दोषी म्हणतात, 'आकंठ संसारात बुडालेला असतो' असे म्हणतात तर दुसरीकडे तो न करणाऱ्याला मात्र आळशी म्हणतात, हा पोटपोसा असून ह्याला फक्त स्वतःच्याच पोटाची चिंता आहे, ह्यास जबाबदारी नको असून केवळ स्वतःचेच पोट कसे भरावे एवढेच हा जाणतो असे म्हणून त्याला हिणवतात.
तसेच कोणी आचाराला धरून संसार वाढविला असता ह्याने किती पसारा वाढवून ठेवला आहे असे म्हणतात आणि तसे न केल्यास मात्र हेच लोक त्याची निंदा करण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत.
तसेच जो संतसंगतीला लागतो, त्यांच्या सानिध्यात राहतो त्याला उपदेशी म्हणतात. त्यांच्या सानिध्यात राहून हा देखील आता उपदेशाला लागणार असे म्हणतात आणि जे सत्संग करत नाहीत त्यांना अभागी, अज्ञानी म्हणून संबोधितात. त्यांच्यापाशी ज्ञान नाही अशी त्यांची टिंगलटवाळी करतात
तसेच ज्याच्याकडे धन-संपत्ती नाही त्याला 'हा मूळचाच करंटा आहे' असे म्हणतात तर दुसरीकडे जे साधन संपत्तीने समर्थ असून ते सामान्यांच्या वाऱ्याला उभे राहत नाहीत म्हणून 'त्यांना संपत्तीचा माज आला आहे' असे म्हणतात व 'स्वतःचा ताठा मिरवण्यातच ते धन्यता मानतात' असे त्यांच्यावर आरोप करतात.
जे बडबड करतात त्यांना वाचाळ लेखतात आणि म्हणून कमी बोलू गेल्यास हा गर्विष्ठच आहे असा लौकिक करतात.
जे लोकं नातेवाईकांच्या भेटीला जात नाहीत, त्यांना भेटणे टाळतात त्यांना निष्ठुर म्हणतात तर जो नित्य सर्वांच्या घरी आपुलकीने ये-जा करतो त्याला 'सततच्या येण्याने आमचे घर बुडवले' असे म्हणून दोषी ठरवतात.
लग्न करण्यासाठी धडपड करणाऱ्याला 'हा चांगलाच माजला आहे' असे म्हणतात आणि न करणाऱ्याला नपुसंक म्हणून हिणवतात.
जे येथे निपुत्रिक आहेत, ज्यांना पोरेबाळें नाहीत त्यांना चांडाळ म्हणून संबोधितात, 'ही सर्व त्यांच्या मागच्या जन्माचीच कर्मे आहेत' असे म्हणतात आणि ज्यांच्या पदरी मोठाच पोरवडा असून ज्यांची परिस्थिती खालावली आहे त्यांना नावे ठेवतात. 'पदरी एवढी पोरेबाळे असल्यानेच त्यांची अशी दशा झाली आहे किंबहुना कोणत्यातरी जन्माचे पातक म्हणूनच त्यांना एवढी पोरे झाली आहेत' असे बोल लावतात.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की येथे ह्या संसारात ज्याप्रकारची माणसे आहेत ते त्याप्रकारचीच भाषा बोलतात आणि त्यांच्या स्वभावानुसारच ते तोंडांतून त्यात्या प्रकारची घाण ओकत असतात.
परंतु अशांची तोंडे आपण कितीही धरावयास गेलो तरीही ती आपण धरू शकत नाही. ज्याप्रमाणे अभक्त असलेल्या किंवा श्रद्धा नसलेल्या माणसाला संतसंग रुचत नाही, ह्या लोकांचे देखील अगदी तसेच असते.
म्हणूनच ते सर्वांना एकच निर्वाणीचा सल्ला देतात की तुम्ही ह्या अशा दुतोंडी लोकांकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या संगतीत राहू नका किंबहुना शक्य तेवढे स्वतःला त्यांच्यापासून लांब ठेवा.
किंबहुना अशा ह्या लोकांचा त्यागच करून सदैव हिताच्या आणि उद्धाराच्या गोष्टीच पदरात टाकणाऱ्या श्रीहरीची सोय धरा. आणि लागायचे असल्यास त्याच्या एकाच्याच नादी लागा. म्हणजेच श्री हरिचरणीच मन दृढ करून त्याची एकाचीच येथे भक्ती करा व सदैव त्याच्या एकाचीच सेवा करा.
अभंग १२४
#सोडूनदेणे #सांडींमांडी #त्याग #त्यजणे
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!