अभंग क्रमांक: ११३
उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं
धरावा ।।
नये जाऊं पात्रावरी । कवटी सार
नारळें ।।
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण
स्मरविती ।।
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार
चिंधीचे ।।
अर्थ:
लवकरचतुकाराम महाराज म्हणतात एखाद्याने जर लाख मोलाचा उपदेश केला असेल पण उपदेश करणारा जरी तुम्हास योग्यतेचा वाटत नसेल तरी त्याचा उपदेश चित्ती धरावा, तो वाया जाऊ देऊ नये. कारण ते म्हणतात जसे मनुष्य नारळाच्या बाहेरील आवरणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या आतील गोड पाणी आणि मधुर खोबरे खातो हे देखील तसेच आहे. ते पुढे म्हणतात त्याचप्रमाणे नारायणाचे स्मरण करून देणारा जरी पुत्र, पत्नी किंवा नोकर असेल तरी त्याचा अव्हेर करू नये उलट तसे केल्याचे त्यांचे आभारच मानावे.
तुकोबाराय म्हणतात तसेच रत्न वाहून नेण्यासाठी पण लोक चिंधीचा उपयोग करतात कारण इतरांना त्यात काय आहे याचा सुगावा लागू नये म्हणून. म्हणूनच ते म्हणतात कोणत्या मनुष्याचा किंवा गोष्टीचा कसा उपयोग होईल हे सांगता यायचे नाही आणि त्यांच्या बाह्यरंगाकडे बघून त्यांची किमत आणि योग्यता ठरवू नये.
अभंग ११३...
Read More

अभंग ११३
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!