← मागील अभंग (52)
पुढील अभंग (54) →

अभंग क्रमांक: ५३


नेणें गाणे कंठ नाही हा सुस्वर । घालू तुज
भार पांडुरंगा ।।
नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायी चित्त
ठेवी देवा ।।
तुका म्हणे मज चाड नाही जना । तुज नारायणा
वाचुनिया ।।

अर्थ:
तुकोबा म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा तुला प्रसन्न करण्यासाठी वा तुझे लक्ष वेधून घेण्यासाठी माझा कंठ गाण गाणे वगैरे जाणत नाही. किंबहुना माझ्या आवाजात सुस्वर देखील नाही. किंबहुना मी गाण्यातील राग, ताल, लय वगैरे देखील काही ठाऊक नाही.
एवढेच नव्हे तर कोणत्या वेळी नेमके काय करावे अथवा काय करावयास हवे हे देखील मी जाणत नाही. किंबहुना मला वेळ-काळ यांचे देखील बंधन राहिलेले नसून त्यांचे भान देखील आता उरलेले नाही. तुझ्या पायी चित्त ठेवणे एवढेच काय ते मी करू शकतो.
म्हणजेच तुझ्या नामाचा जप करणे व तुला सदैव स्मरणात ठेवणे एवढेच काय ते मी जाणतो. आणि तेवढेच काय ते मी करू शकतो.
तेव्हा मी आता माझा सर्वभार तुझ्या पायाशी ठेवलेला असून मी मात्र या सर्वातून मोकळा झालेलो आहे. किंबहुना मी तो तुझ्या शिरिच घातला असून मी माझे सर्वांग त्यातून काढूनच घेतलेले आहे.
तेव्हा माझ्या पुढील आयुष्याचे काय करायचे हे तूच काय ते आता पहा.
कारण आता मला कसलीही चाड उरलेली नसून कोणत्याही गोष्टीची आस देखील राहलेली नाही. एवढेच नव्हे तर मला आता लोकलाज देखील राहिलेली नसून इतर कसली चाड देखील उरलेली नाही. ... Read More
← मागील अभंग (52)
पुढील अभंग (54) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!