अहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार
पुत्र झाला ।।
गळेचिना गर्भ नव्हेच का वांझ । माता त्याची लाज
लावी पापी ।।
परपीडे परद्वारी सावधान । सादरचि मन
अभाग्याचे ।।
न मिळतां निंदा चहाडी उपहास । संग्रहावे दोष
सकळही ।।
परउपकार पुण्य त्या वावडे । विषाचे ते किडे
दुग्धी मरे ।।
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती । दया क्षमा शांती
नातळे त्या ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!