← मागील अभंग (278)
पुढील अभंग (280) →

पुनरूपी इंद्रियांच्या अधीन होऊ लागल्यावर

Published on: 26 Feb 2026, 06:06 AM

परिस्थिती / संदर्भ:

संत तुकाराम महाराज या अभंगात देवा पांडुरंग यांना त्यांच्या करुणामय स्वभावाची आठवण करून देतात. कल्पतरु आणि परिस यांची उदाहरणे देत, भक्ताला कधीही रिकाम्या हाताने परत न पाठवणे हा देवाचा धर्म असल्याचे ते ठामपणे सांगतात. हा अभंग भक्ताच्या आर्त हाकेला आणि परमेश्वरावरील अखंड विश्वासाला व्यक्त करतो.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २७९


झाड कल्पतरू । न करी याचकी
आव्हेरू ।।
तुम्ही सर्वा सर्वोत्तम । ऐसे विसरता
धर्म ।।
परिसा तुमचे देणे । तो त्या जागे
अभिमाने ।।
गाऱ्ह्याणाने तुका । गर्जे मारुनिया
हाका ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा ज्याप्रमाणे कल्पतरुचे झाड दाराशी आलेल्या याचकाचा कधीही अव्हेर करीत नाही, त्यास केव्हाही विन्मुख होत नाही, त्याकडे केव्हाही पाठ फिरवत नाही आणि वर त्यास कधीही रिकाम्या हाती माघारी धाडत नाही..
त्याप्रमाणेच तुमचे देखील वर्तन असावयास हवे. कारण तुम्ही देखील त्या कल्पतरु वृक्षाप्रमाणेच एक आहात. नव्हे, कल्पतरुच आहात. किंबहुना तुम्ही त्याहूनही श्रेष्ठ आहात, सर्वात सर्वोत्तम आहात. तरीदेखील तुम्ही तुमचा धर्म विसरता आहात.
म्हणजेच ज्याप्रमाणे कल्पतरुचे झाड आपला धर्म, आपले कर्तव्य विसरत नाही आणि परिस देखील आपले कर्तव्य संपूर्णपणे जाणून आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या कर्तव्याप्रति दक्ष असणे गरजेचे आहे.
म्हणजेच दाराशी आलेल्या याचकाची सर्व मनोरथे पूर्ण करणे, त्यास हवे असलेले दान त्याच्या पदरी घालणे हे जसे कल्पतरुचे कर्तव्य आहे, त्याप्रमाणेच लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणे हा परिसाचा धर्म आहे, त्याचे कर्तव्य आहे. आणि तो त्यास अभिमानाने मिरवतो व कटाक्षाने पाळतो.
किंबहुना ही त्यास मिळालेली सर्वात मोठी देणगी असून तुम्हीच ती त्यास देऊ केली आहे. म्हणजेच परीसाला तुमच्याकडून मिळालेले ते एक देणेच आहे. एकार्थी त्याला दिलेली तुम्ही ती सिदधीच आहे आणि तो देखील त्यास अद्याप जागृत आहे.
म्हणजेच आपल्या कर्तव्यास ते दोघेही अद्याप विसरलेले नसून आपापल्य... Read More
← मागील अभंग (278)
पुढील अभंग (280) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!