देवाचा असा तटस्थपणा पाहून तुकोबा आता देवावर देखील चिडू लागले आहेत. तुकोबा म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा तुम्ही माझ्यासोबत चेष्टा तर करत नाही आहात ना? माझी टिंगळ-टवाळी किंवा मस्करी तर करत नाही आहात ना? आणि करत असाल तर तसे करणे ताबडतोब थांबवा.
कारण मी काही कोणी साधारण साळी किंवा कोष्टा मनुष्य नाही जो तुझ्या या खेळाला बळी पडेन अथवा त्याला सहज भुलेन. आणि एकदाचा कंटाळून माघारी फिरेन.
म्हणजेच तू जसा इतरांसोबत व्यवहार करतोस वा अन्य सामान्यांना वागवतोस, तसा माझ्याशी मात्र करू नकोस. अथवा तसा करण्याचा साधा प्रयत्न देखील करावयास जाऊ नकोस. आणि मी हे तुला आगावूच सूचित करत आहे.
म्हणजेच तुझ्या दाराशी आलेल्या अन्य सामान्य लोकांसोबत ज्याप्रमाणे तू वर्तन करतोस व त्यांना जशा प्रतिक्रिया देऊन आल्या पाऊली परतावून लावतोस, तसे काही माझ्याशी करण्याचा तू चुकूनही प्रयत्न करू नकोस.
कारण तू जर श्रीहरि विष्णु असशील तर मी देखील तुझाच दास आहे. तुझाच सेवक आहे. आणि आम्ही विष्णुदास तुला आता चांगलेच ओळखू लागले आहेत. तुला आता अंतर्बाह्य जाणून आहोत.
आणि हेच नव्हे तर येथील सर्वजण देखील मला आता तुझ्याच नावाने ओळखतात. तुझ्याच नावाशी माझे नाव जोडले गेले असून विष्णुदास म्हणूनच माझी आता सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. मला आता याच नावाने सर्वजण ओळखू लागले आहेत.
एवढेच नव्हे तर तू खेळत असलेले खेळ देखील आमच्या नित्...
Read More

एवढेच नव्हे तर तू खेळत असलेले खेळ देखील आमच्या नित्य परिचयाचे झाले असून आम्ही विष्णुदास देखील त्यात आता चांगलेच पारंगत झाले आहोत. आणि त्यातील रस कोणता आणि नीरस कोणता हे देखील आम्हाला आता चांगलेच कळू लागले आहे.
त्यामुळे आम्ही तुझ्या सर्वाधिक निकटचे, जवळचे लोकं झाली असून आमच्याशी तू करत असलेला असा हीन व्यापार आम्ही विष्णुदास तरी यापुढे खपवून घेणार नाही. किंबहुना आमच्यापुढे तो सरणारच नाही. चालणारच नाही.
तेव्हा तू तुझा मोठेपणा निदान मला तरी दाखवू नकोस. तुझ्या या मोठेपणाची शेखी अथवा थोरपणाचा दिमाख किमान माझ्यापुढे तरी मिरवू नकोस. आम्हा विष्णुदासांना तो चांगलाच ठाऊक असून आम्ही तो अत्यंत चांगल्या रीतीने जाणून आहोत.
आणि हळूहळू का होईना, तुझा स्वभाव देखील मला आता कळू लागला असून तुझ्या इतर सवयी देखील मला चांगल्याच ठाऊक झाल्या आहेत. त्यामुळे तुझ्या या वर्तुणुकीला आम्ही विष्णुदास फसू असे यापुढे तरी केव्हाही घडणे नाही.
आणि तरीही माझ्यासोबत देखील तुला अन्यांसारखाच व्यवहार करायचा असेल तर तू देखील जा आणि तुझे हे मुख, हे तोंड कोठेतरी जाऊन काळे कर. किंबहुना ते यापुढे मला दाखवूच नकोस. मला यापुढे ते पहायचेच नाही.
अभंग २७२
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!