तुकाराम महाराज म्हणतात अशा या संतांचा महिमा मी आता शब्दात काय आणि कसा वर्णन करु? त्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील.
ते म्हणतात अशा या संतांच्या केवळ दर्शनाने देखील मोक्षप्राप्ती होते आणि मुक्तीचा लाभ पदरी येतो. त्यांच्या सहवासाने देखील अथवा त्यांनी दिलेल्या नुसत्या आलिंगनाने देखील मनुष्यास सायुज्यता प्राप्त होते आणि त्यास मोक्षलाभ घडतो.
ते म्हणतात असा हा संतांचा महिमा अगाध असून त्यांची थोरवी कोणीही शब्दात वर्णन करू शकत नाही. किंबहुना एका मर्यादेपलीकडे हे शब्द देखील तोकडे पडू लागतात.
तुकोबाराय शेवटी म्हणतात असे हे संतांचे चरित्र असून हे संत म्हणजे स्वतःच एका तीर्थासमान असतात. म्हणजेच तेच जणू एखादे तीर्थक्षेत्र असून त्यांच्या पायांशी अवघी तीर्थे एकवटली आहेत. आणि म्हणून अशा या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडताच सर्वांनी त्यात आपले उखळ पांढरे करून घ्यावे आणि त्यांची सेवा करण्याची एकही संधी व्यर्थ दवडू नये, वाया घालवू नये.
कारण यांची सेवा करणे ही थेट देवाची सेवा कण्यासारखेच असून ती अखेर त्यालाच प्राप्त होते, ती थेट देवालाच पोहचते हे सर्वांनी येथे कायमचे लक्षात ठेवावे.
============
मुक्तीचे चार प्रकारच्या आहेत.
१. सलोकता=इष्ट देवतेच्या लोकांत राहणे.
२. समीपता= इष्ट देवतेच्या नित्य सानिध्यात राहणे.
३. सरूपता = इष्ट देवतेचे रूप प्राप्त होणे.
४. सायुज्यता = ही चौथी मुक्ती असून शेवटची आ...
Read More

४. सायुज्यता = ही चौथी मुक्ती असून शेवटची आहे. परमेश्वराशी किंवा आत्मरुपाशी एकरूप होऊन जाणे.
मुक्ती ह्या नेहमी जिवंतपणीच लाभतात आणि त्या लाभल्यानंतरच मरणानंतर मग मोक्ष लाभतो.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!