Published on: 08 Aug 2026, 07:55 AM
परिस्थिती / संदर्भ:
देहबुद्धि वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं
सुख मानी ।।
थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी
चोरीं नेली ।।
गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा
दंभलोभें ।।
पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण
पडे गांठी ।।
तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात
कोण करी ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!