तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आता यापुढे आम्ही अबोलण्यानेच बोलतो आणि मेल्यागतच राहून हे जीवन जगतो आहे. आणि तरीही मी तुम्हाला येथे बोलताना दिसत असलो तरीही मी खरा बोलत नसून केवळ व्यावहारिक दृष्ट्याच बोलत आहे.
कारण असे हे भोग भोगून माझ्या वाणीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. मी आत्मदृष्टीने आता अबोल झालो आहे. माझे सर्व बोलणेच खुंटले आहे. परंतु माझ्याठायी हा देह अजून शाबूत असल्याने मला बोलावे लागते आणि चारचौघात वावरावे लागते आणि व्यावहारिक दृष्टीने या संसाराचा भोग घ्यावा लागतो.
परंतु खऱ्या अर्थाने मी या संसारात नाही. मी कितीही कोणाच्याही संगतीत दिसलो तरीही मी कोणाच्याही संगतीत नाही, अगदी या देहाच्याही नाही आणि कितीही येथील भोगांचा उपभोग घेताना दिसत असलो तरीही ते देखील माझ्यासाठी आता त्यागासमानच झाले आहेत.
म्हणजेच माझ्याठायी देह अजूनही शाबूत असल्यामुळे मी व्यावहारिक दृष्टीने तुम्हाला येथे दिसत आहे. परंतु तसे नसून मी केव्हाच या जगाला रामराम ठोकला आहे. आणि ह्या विश्वात असूनही नसल्यासारखाच आहे किंबहुना 'मी येथे नाहीच'.
एवढेच नव्हे तर माझे बाहेर जाणारे आणि आत येणारे सर्व मार्ग देखील आता तुटले असून इतर पाशदेखील आता सर्व गळून पडले आहेत. आणि खऱ्या अर्थाने मी संपुष्टात आलो आहे. आणि एवढे सांगूनही तुम्हाला हे पटत नसेल किंवा खरे वाटत नसेल तर तुम्ही खुशाल पांडुरंगाला विचारू शकता....
Read More
तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आता यापुढे आम्ही अबोलण्यानेच बोलतो आणि मेल्यागतच राहून हे जीवन जगतो आहे. आणि तरीही मी तुम्हाला येथे बोलताना दिसत असलो तरीही मी खरा बोलत नसून केवळ व्यावहारिक दृष्ट्याच बोलत आहे.
कारण असे हे भोग भोगून माझ्या वाणीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. मी आत्मदृष्टीने आता अबोल झालो आहे. माझे सर्व बोलणेच खुंटले आहे. परंतु माझ्याठायी हा देह अजून शाबूत असल्याने मला बोलावे लागते आणि चारचौघात वावरावे लागते आणि व्यावहारिक दृष्टीने या संसाराचा भोग घ्यावा लागतो.
परंतु खऱ्या अर्थाने मी या संसारात नाही. मी कितीही कोणाच्याही संगतीत दिसलो तरीही मी कोणाच्याही संगतीत नाही, अगदी या देहाच्याही नाही आणि कितीही येथील भोगांचा उपभोग घेताना दिसत असलो तरीही ते देखील माझ्यासाठी आता त्यागासमानच झाले आहेत.
म्हणजेच माझ्याठायी देह अजूनही शाबूत असल्यामुळे मी व्यावहारिक दृष्टीने तुम्हाला येथे दिसत आहे. परंतु तसे नसून मी केव्हाच या जगाला रामराम ठोकला आहे. आणि ह्या विश्वात असूनही नसल्यासारखाच आहे किंबहुना 'मी येथे नाहीच'.
एवढेच नव्हे तर माझे बाहेर जाणारे आणि आत येणारे सर्व मार्ग देखील आता तुटले असून इतर पाशदेखील आता सर्व गळून पडले आहेत. आणि खऱ्या अर्थाने मी संपुष्टात आलो आहे. आणि एवढे सांगूनही तुम्हाला हे पटत नसेल किंवा खरे वाटत नसेल तर तुम्ही खुशाल पांडुरंगाला विचारू शकता.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!