← मागील अभंग (211)
पुढील अभंग (213) →

भोग भोगणे आले असता काय करू नये?

Published on: 23 Aug 2025, 06:51 AM

परिस्थिती / संदर्भ:

तुकाराम महाराज म्हणतात भोग भोगणे का येते? ह्या लेखात आपण मनुष्य जन्माला का येतो? किंवा त्याला आयुष्य का लाभते यामागील कारण पाहिले. त्यामुळे ते कळल्यावर निदान यापुढे तरी मनुष्याने सत्याने वागावे, खऱ्याची कास धरावी आणि आपले प्रारब्ध शांतचित्ताने भोगावे, कठीण परिस्थिती येता चित्त सदैव समाधानी कसे राहील हेच पाहावे आणि गोष्टी नेहमी धीराने घ्याव्यात.

कारण आपले प्रारब्ध किती बळिवंत आहे, किती गाढ आहे हे कोणासही आधी ठाऊक नसते, त्याला त्याची साधी कल्पना देखील नसते. तो बहुधा नेहमीच गाफील असतो.

म्हणजेच कधी, कोणत्या काळी आपल्या सोबत काय घडेल, कोणत्या अवघड परिस्थितीला आपणास सामोरे जावे लागेल हे त्यास ध्यानीमनी देखील नसते. आणि म्हणूनच परिस्थितीला तोंड देण्यास मनुष्याने नेहमी तत्पर असावे.

आणि त्यात अशात मन जर शांत असेल, नेहमी कसल्या ना कसल्या उद्वेगाने भरलेले असेल तर सर्वकाही अधिकच कठीण होऊन बसते.

परंतु एखादा मनुष्य जर धीराचा असेल, गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याने प्रयत्नाने पालटला असेल, तर न सांगता आलेली वेळ तो धिराने निभावून नेतो. त्यावर, त्याच्या मनावर आघात कमी होतात. ज्यामुळे त्याचे भोग देखील मग सुसह्य होऊन त्याला प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग देखील काढता येतो, त्यात्या वेळी योग्य तो उपाय योजून बिकट परिस्थितीतून तो मार्ग देखील काढून शकतो आणि कठीण परिस्थितून सुटण्याची वाट त्यात आपसूकच सापडत जाते.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: २१२


शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर
गाढे ।।
येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें
भाई ।।
करिती होया होय । परी नव्हे
कोणी साह्य ।।
तुका म्हणे घडी । साधिलिया एक
थोडी ।।

अर्थ:
आणि मुख्य म्हणजे भोग भोगणे आले असता मनुष्याने केव्हाही त्याचा शोक करत बसून नये. टिपे गाळत बसू नये. तसे करत बसाल किंवा टिपे गाळत बसाल तर शोकाने केवळ शोक वाढून पदरी अधिकच दुख येईल आणि जीवन अधिकाधिक दुखीकष्टी होईल. कारण शोकाने शोक केवळ वाढतच जातो आणि परिस्थिती अधिकच बिकट होऊन बसते. किंबहुना ती अधिकच अवघडच होऊन बसते आणि सर्वकाही हाताबाहेर जाते.

त्यापेक्षा देवाचे नाम गाऊन आणि त्याची आठवण ठेवून परिस्थिती कशी सुसह्य होत जाईल हे पाहावे.

परंतु तसे न करता कोणी जर येथे प्रत्येक परिस्थितीत दुःख करत बसेल, टिपे गाळत राहील किंवा शोक करत राहील, तर शोकाने शोक अधिकच वाढतच जाऊन परिस्थिती अधिकच हाताबाहेर जात जाईल आणि सर्वकाही अवघडच होऊन बसेल. आणि अशात जर लंडीपणे / खोटेपणाने वागाल तर प्रारब्ध अधिकाधिक गाढ होत जाईल.

आणि म्हणून तसे घडू नये यासाठी मनुष्याने नेहमी सत्याने वागावे, मनाला धैर्याची वाट दाखवावी, दैनंदिन जीवनातच धीर धरण्यास शिकवावा आणि जितक्या शक्य तितक्या लवकर परमार्थाला लागावे, श्री हरिला शरण जावे, जेणेकरून आयुष्य केवळ सुखकरच न होता संपूर्ण चिंताविरहीत देखील होऊन ह्या भवसागरात असूनही भवदुःख मनुष्याच्या जवळ येऊ शकणार नाहीत, त्याला शिवू शकणार नाही आणि त्याची प्रारब्धातून हळूहळू सुटका होत जाईल.
त्यापेक्षा धैर्य दाखवणे केव्हाही चांगले, धीराने घेणे केव्हाही चांगले.

कारण ते म्हणतात ह... Read More
← मागील अभंग (211)
पुढील अभंग (213) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments
Krushna Madake (2025-09-05 14:22:30)

खूप छान