तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा नारायणा, हे पांडुरंगा माझे तुझ्याकडे केवळ एवढेच मागणे आहे की मला तुझा दास म्हणवून घ्यायचे आहे, तुझ्या सेवक म्हणवून घ्यायचे आहे. आणि माझी एवढीच काय ती इच्छा आहे.
किंबहुना माझ्या मनाला देखील एवढीच काय ती आस लागून राहिली आहे. परंतु ते देखील मला धड साध्य करता येत नाही.
म्हणजे हे देखील नेमके कशाने घडेल मला ठाऊक नाही. तेव्हा हयात देखील तू मला कृपया सहाय्य करावेस अशी माझी तुला विनंती आहे. किंबहुना माझे तुझ्याकडे हे मागणेच आहे असे समज.
म्हणजेच काय तर ह्याचे देखील वर्म किंवा गुपित कशात दडलेले आहे मला ठाऊक नाही. तेव्हा तूच ते आता माझ्यापाशी उघड कारावेस अशी मी तुला गळच घालतो आहे असे जाण.
कारण भक्ति कशी करावी वा कशी करू नये हे मला खरच ठाऊक नाही. व मनात काहीही भाव नसताना भक्ति करणे मला खरच अवघड जाते आहे. तोंडाने काहीतरी पुटपुटणे वा बडबडणे एवढेच काय तो मी करतो आहे. आणि याचाच पसारा मांडून ठेवला आहे.
थोडक्यात काय तर भक्तीचा पसारा मांडून ठेवणे हे मात्र मला चांगलेच जमू लागले आहे. आणि ते कसे मिरवता येईल हे देखील मे चांगलेच शिकलो आहे. किंबहुना तसेच मिरवतो आहे. परंतु माझे मनच मला आता खाऊ लागले आहे.
कारण तुझ्या प्रती मनात काडीचाही भाव उत्पन्न झालेला नसताना मी हा असा अधर्म मांडून ठेवला आहे. परंतु त्यामागील माझा हेतू मात्र चांगला असल्यामुळे माझी तुला अशी विनंत...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा नारायणा, हे पांडुरंगा माझे तुझ्याकडे केवळ एवढेच मागणे आहे की मला तुझा दास म्हणवून घ्यायचे आहे, तुझ्या सेवक म्हणवून घ्यायचे आहे. आणि माझी एवढीच काय ती इच्छा आहे.
किंबहुना माझ्या मनाला देखील एवढीच काय ती आस लागून राहिली आहे. परंतु ते देखील मला धड साध्य करता येत नाही.
म्हणजे हे देखील नेमके कशाने घडेल मला ठाऊक नाही. तेव्हा हयात देखील तू मला कृपया सहाय्य करावेस अशी माझी तुला विनंती आहे. किंबहुना माझे तुझ्याकडे हे मागणेच आहे असे समज.
म्हणजेच काय तर ह्याचे देखील वर्म किंवा गुपित कशात दडलेले आहे मला ठाऊक नाही. तेव्हा तूच ते आता माझ्यापाशी उघड कारावेस अशी मी तुला गळच घालतो आहे असे जाण.
कारण भक्ति कशी करावी वा कशी करू नये हे मला खरच ठाऊक नाही. व मनात काहीही भाव नसताना भक्ति करणे मला खरच अवघड जाते आहे. तोंडाने काहीतरी पुटपुटणे वा बडबडणे एवढेच काय तो मी करतो आहे. आणि याचाच पसारा मांडून ठेवला आहे.
थोडक्यात काय तर भक्तीचा पसारा मांडून ठेवणे हे मात्र मला चांगलेच जमू लागले आहे. आणि ते कसे मिरवता येईल हे देखील मे चांगलेच शिकलो आहे. किंबहुना तसेच मिरवतो आहे. परंतु माझे मनच मला आता खाऊ लागले आहे.
कारण तुझ्या प्रती मनात काडीचाही भाव उत्पन्न झालेला नसताना मी हा असा अधर्म मांडून ठेवला आहे. परंतु त्यामागील माझा हेतू मात्र चांगला असल्यामुळे माझी तुला अशी विनंती आहे की तू देखील आता तुझे कर्तव्य करावेस.
म्हणजेच तू देखील तुझा धर्म नीट आचरावास आणि माझ्या चुका पोटात घालून माझी भक्ति गोड मानून घ्यावीस व माझा उद्धार कारावास.
अभंग १९०
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!