तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा तू मला कुणबी केलेस नाहीतर जर उच्चकुळात जन्माला येऊन उगीच अभिमानाने आणि त्यापायी दंभाने मेलो असतो.
ते देवाला म्हणतात खरेच हे देवा तू भले केलेस कारण आज मी नम्र होऊन सर्वांच्या पाया पडू शकतो आणि आनंदाने नाचू शकतो.
तसेच ते म्हणतात जर माझ्याजवळ एखादी विद्या किंवा कला असती तर त्याचा मला अपायच झाला असता. त्याच्यामुळे माझ्याहातून संतसेवा घडली नसती आणि माझ्या नरदेहाची व्यर्थ नागवण झाली असतो, (माझा आयुष्य उगीच वाया गेला असता).
तुकोबाराय शेवटी म्हणतात की माझ्या जर अंगी गर्व, ताठा आला असता तर माझ्या हातून पापे घडून मी यमपंथाला लागलो असतो. कारण ते म्हणतात मोठेपणाच्या किंवा थोरपणाच्या अभिमानाने अनेकजण शेवटी नरकातच जातात, तेथेच त्यांना स्थान मिळते....
Read More
तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा तू मला कुणबी केलेस नाहीतर जर उच्चकुळात जन्माला येऊन उगीच अभिमानाने आणि त्यापायी दंभाने मेलो असतो.
ते देवाला म्हणतात खरेच हे देवा तू भले केलेस कारण आज मी नम्र होऊन सर्वांच्या पाया पडू शकतो आणि आनंदाने नाचू शकतो.
तसेच ते म्हणतात जर माझ्याजवळ एखादी विद्या किंवा कला असती तर त्याचा मला अपायच झाला असता. त्याच्यामुळे माझ्याहातून संतसेवा घडली नसती आणि माझ्या नरदेहाची व्यर्थ नागवण झाली असतो, (माझा आयुष्य उगीच वाया गेला असता).
तुकोबाराय शेवटी म्हणतात की माझ्या जर अंगी गर्व, ताठा आला असता तर माझ्या हातून पापे घडून मी यमपंथाला लागलो असतो. कारण ते म्हणतात मोठेपणाच्या किंवा थोरपणाच्या अभिमानाने अनेकजण शेवटी नरकातच जातात, तेथेच त्यांना स्थान मिळते.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!