← मागील अभंग (169)
पुढील अभंग (171) →

अभंग क्रमांक: १७०


एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन ।श्वानविष्ठेसमान । अधम जन
तो एक ।।
एका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन ।गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान
विष्णूशी ।।
अशुद्ध विटालशीचे खळ । विडा भक्षिता तांबूल ।सापडे सबळ । काळाहाती न
सुटे ।।
शेज बाज विलास भोग । करिसी कामिनिशी संग ।त्या जोडे क्षयरोग । जन्म व्याधी
बळिवंत ।।
आपण न वजे हरिकीर्तना । आणिका वारी जातां जना ।त्याच्या पापा जाणा । ठेंगणा महामेरू
तो ।।
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित ।तुका म्हणे व्रत । एकादशी
चुकलीया ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात जे एकादशीस अन्न पान करतात, भोजन ग्रहण करतात तो मनुष्य अधम असून श्वानाच्या/कुत्र्याच्या विष्ठेसारखा असतो. परंतु दुसऱ्या बाजूला जे लोक या दिवसाचे आणि या व्रताचे महत्व जाणून असतात, ते ओळखतात आणि दरवर्षी नित्यनेमाने त्याचे पालन करून हरिकीर्तन करतात ते विष्णूसमानच आहेत असे जाणावे.
ते पुढे म्हणतात तसेच ह्या दिवशी जे विडा, तांबुल खातात, म्हणजेच अशा निषिद्ध गोष्टींचे सेवन करतात ते अशुद्ध आणि विटाळलेल्या स्त्री समान असतात आणि असा मनुष्य मग कधीही सुटका न होणाऱ्या काळाच्या हातात सापडतात. तसेच या दिवशी जो विलासी बाजेवर/पलंगावर पडून कामिनिशी संग करतो त्याला तर क्षयरोग होतो, म्हणजेच क्षयरोगासारखी सर्वात कठीण अशी व्याधी जडते.
तसेच ते सांगतात जे लोक यादिवशी स्वतः हरिकीर्तन करीत नाही किंवा त्याला जात नाही आणि दुसऱ्यांना देखील जाण्यापासून अडवितात त्यांच्या पदरी तर पापांच्या राशीच येतात, ज्याच्यापुढे मग एखादा महामेरू देखील ठेंगणा वाटावा.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की ज्याचे एकादशी व्रत चुकते असे लोक मग पुढे यमाचे अंकितच होतात, त्याच्या अधीन होतात आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या कठीण दंडाला त्यांना सामोरे जावे लागते.... Read More
← मागील अभंग (169)
पुढील अभंग (171) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!