← मागील अभंग (142)
पुढील अभंग (144) →

ज्ञानाची उपरती होऊनही भक्ति कशी करावी याचे वर्म मात्र ठाऊक नसताना.

Published on: 27 Oct 2025, 07:30 AM

परिस्थिती / संदर्भ:

लवकरच

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १४३


तान्हेल्याची धणी । फिटे गंगा
नव्हे उणी ।।
माझे मनोरथ सिद्धी । पाववावे
कृपानिधी ।।
तू तो उदारांचा राजा । माझी अल्पचि
वासना ।।
कृपादृष्टी पाहे । तुका म्हणे
होई साह्ये ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा जेव्हा गंगा तहानलेल्यांची तहान भागविते, त्यांची तृष्णा भागविते तेव्हा तिच्या ओहोळातील पाणी किंचितही कमी होत नाही. तिच्या पाण्यात केव्हाही कसलीही उणीव येत नाही.
उलट तहानलेल्यांची तहान संपूर्ण भागून त्यांचे मन भरेपर्यंत समाधान देखील होते. ते म्हणतात हे देवा पांडुरंगा तुम्ही देखील त्या गंगा नदीसारखेच आहात.
तुम्ही देखील द्वारी आलेल्या याचकाच्या इच्छा पूर्ण करता तेव्हा तुम्हाला कसलेही उणे येत नाही. कमीपणा येत नाही. उलट याचकाची इच्छा पूर्ण करून तुम्ही त्यांच्या मनाचे समाधानच करता आणि वर त्यांना धन्य करून सोडता.
एवढेच नव्हे तर त्याने तुमची थोरवी देखील वृद्धिंगत होते आणि भक्तांचा तुमच्या प्रती भाव आणि विश्वास देखील बळावतो.
तेव्हा तुम्ही माझी देखील ही मनोरथे सिद्धीस नेऊन मला पावावे. आणि मला धन्य करून सोडावे अशी माझी इच्छा आहे.
ते पुढे म्हणतात हे देवा, हे कृपानिधी तू कृपाळू-दयाळू आहेस, उदार आहेस. किंबहुना उदारांचा राजाच आहे. आणि त्यापुढे माझी ही वासना अत्यल्प आहे. आणि ती पूर्ण करणे तुला सहज शक्य आहे.
तेव्हा हे नारायणा, हे विठ्ठला माझ्याकडे कृपादृष्टीने पाहून तू माझ्या ह्या इच्छा पूर्ण कराव्यास आणि मला सर्वतोपरी सहाय्य करावेस अशी मी तुला केवळ विनंतीच नव्हे तर गळच घालत आहे.
अभंग १४३... Read More
← मागील अभंग (142)
पुढील अभंग (144) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!