कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें
लोक ।।
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम
ते गुण ।।
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार
उठाउठी ।।
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित
लोकां ।।
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची
वृत्ति ।।
नाहीं देवार्चन । असे मांडिलें
दुकान ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!