← मागील अभंग (121)
पुढील अभंग (123) →

अभंग क्रमांक: १२२


गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं
त्याग केला ।।
गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ
गंगाओघ ।।
कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां
दोष ।।
शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें
नाश पातकांसि ।।
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार
पिंगळेचा ।।
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध
काय आहे ।।
न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी
स्मरतां मुक्त ।।
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी
नरक त्यासि ।।
//

अर्थ:
भक्ती कोण करू शकत... Read More
← मागील अभंग (121)
पुढील अभंग (123) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!