Published on: 07 Oct 2025, 03:35 PM
परिस्थिती / संदर्भ:
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा
ऐके भावें ।।
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे
मिठी गोडपणें ।।
जाणोनियां लाभ घेई हा पदरीं । गोड गोडावरी
सेवीं बापा ।।
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड
आहे तुझी ।।
नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी
सारचंदनाची ।।
जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी
हरिकथेविण ।।
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें
तिष्ठे कथे ।।
तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आवघें
मूळ तेथें ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!