'कांतारा' या कन्नड चित्रपटातील भुत कोला काय आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात कोठे आहेत?

PC: Google

तुकोबांचे अभंग

आपण याठिकाणी दोन अर्थ पाहणार आहोत परंतु शेवटी दोहींचे सार एकच आहे.

भूतकोला म्हणजे काय?

भाग १:

भूतकोला हा भूतकाला शब्द असावा. बहुदा या शब्दाचा अपभ्रंश झाला असावा. त्यामुळे कन्नडमध्ये कालाऐवजी तो कोला झाला. आणि काला हा शब्द आपण मराठीत संतांच्या अभंगांमध्ये वारंवार वाचला आहे. त्यामुळे आपण त्यास भूतकाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आणि भूत म्हणजे या पृथ्वीतलावरील लोकांना संबोधिले जाते. त्यात आपण सर्वचजण येतो. म्हणजे जे जीव या पृथ्वीतलावर इच्छा-आकांक्षा घेऊन आलेले आहेत त्या सर्व जीवांना भूत असे संबोधिले जाते. म्हणजेच देहात असलेले व नसलेले असे सर्वच जीव ही भुतं आहेत व असतात हे लक्षात घ्यावे.

परंतु भूत हा शब्द बहुधा जे देहात नाहीत अशांसाठीच अधिक वापरात असल्याने भूत म्हंटले की आपल्या समोर मृत जीव येतात. कारण एखाद्या जीवाने देह सोडला तरीही त्याच्याठायी असलेल्या इच्छा-आकांक्षा काही त्यास सोडत नाहीत. कारण एकाच जन्मात माणसाच्या सर्वच इच्छा संपूर्णपणे कधीच पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यास नवनवीन जन्म घ्यावे लागतात व जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावे लागते. परंतु देहत्यागानंतर नवीन देह लाभेस्तोवर काही जीव प्रकृतीत लीन होतात तर अन्य जीव ह्या पृथ्वीभोवतीच भटकत राहतात.

कारण असे हे भटकत राहणारे जीव नवीन देह मिळेपर्यंत पुढील मार्गक्रमण करण्यास इच्छुक नसतात व जोवर त्यांच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण होत नाहीत तोवर ते येथेच भटकत राहतात. नवीन देहाची ते प्रतीक्षा करत नाहीत. असो. येथे हा मुद्दा नाही.

तेव्हा भूत म्हणजे देहात असलेले व नसलेले असे दोन्ही जीव. परंतु यामध्ये इतर जीवजंतू येत नाहीत. उदाहरणार्थ पशु, पक्षी, किडे, मुंग्या, कीटक वगैरे व आणखीही काही इतर प्रकार. कारण हे जीव केवळ ह्या भूतलावर भोगण्यासाठीच येतात. त्यांच्याठायी इच्छा-आकांक्षा व आसक्ती नसते. त्यामुळे देहात असताना ते विनाकारण कसलाही संचय करत नाही, त्यामुळे त्यांनाठायी प्रारब्धनिर्मिती होत नाही व त्यामुळे मेल्यानंतर या भूलातावर ते भटकत राहत नाहीत.

तर दुसरीकडे कोला या शब्दाचा बहुधा काला शब्द असावा. ज्याचा अर्थ म्हणजे एकत्र करणे किंवा एकत्रित येणे. आणि ते देखील एखादे हितकारक कार्य करण्यासाठी. जसे दहीकाला वगैरे.

त्यामुळे भूतकोला किंवा भूतकाला म्हणजे जिवंत व मृत लोकांचे एकेठिकाणी एकत्रित येणे वा त्यांचे एकेठिकाणी एकत्रित जमणे. परंतु कशासाठी? तर स्वतःचे हित पदरी पाडून घेण्यासाठी व त्याद्वारे स्वतःचा उद्धार घडवून आणण्यासाठी. जे साधण्यासाठीच मुख्यत्वे आपल्या सर्वांना हे आयुष्य आणि हा नरदेह लाभलेला आहे. जेणेकरून मनुष्य जन्माचा हा सर्वोच्च लाभ आपण आपल्या पदरी पाडून घेऊ शकू.

उदा. दहीकाला.

पाहू गेल्यास ‘काला’ या शब्दाची ओळख नारायणानेच आपल्याला करून दिलेली आहे. तेव्हा अशा या दहीकाला मध्ये तो आपल्या सवंगड्यांना मोठ्या प्रमाणात जमा करून लोण्याची चोरी करतो. जे मग जमलेल्या सर्वांच्यात वाटून नंतर स्वतःदेखील तेवढ्याच आनंदाने व कौतुकाने खातो.

तेव्हा येथे लोणीच का? तर लोणी येथे एक रूपक म्हणून वापरले गेले आहे. कारण त्याच्या तयार होण्याच्या प्रक्रियेशी व आयुष्याच्या खऱ्या साराशी चांगलीच सांगड घालता येते म्हणून. कारण सर्व संतांनी मनुष्याच्या सर्वोच लाभाला म्हणजेच ब्रह्मानंदाला आपापल्या अभंगांमध्ये नेहमी नवनीताचीच (म्हणजेच लोण्याचीच) उपमा दिली आहे.

कारण ज्याप्रमाणे लोण्याला आहारामध्ये जसे एक विशेष महत्व व स्थान आहे व ते अनेक गुणधर्मांनी युक्त असून मनुष्याच्या स्वास्थ्याला त्याचे कित्येक फायदे आहेत व होतात आणि वर ते अनेक प्रयत्नांनीच आणि एक विशिष्ट काळ लोटल्यानंतरच मनुष्याच्या हाती लागते त्याप्रमाणे मनुष्याचे खरे हित असलेल्या ब्रह्मानंदाचे देखील अगदी तसेच आहे. व लोण्याच्या स्वभाव पाहू जाता ते सर्वांना आपसूकच कळून चुकेल .

म्हणजेच लोणी हा पदार्थ व त्याचे अस्तित्व एरव्ही उघड्या डोळ्यांना दिसत नाही. परंतु एखादि विशिष्ट प्रक्रिया घडवून आणली असता ते नजरेसमोर आपोआप प्रकटते.

म्हणजे आपण ज्यास पूर्णब्रह्म असे म्हणतो अशा अन्नात, विशेषतः दुधामध्ये ते दडलेले असून ते तयार होईस्तोवर एक विशिष्ट कालावधी जावयास लागतो व अंती त्यास घुसळूनच बाहेर काढावे लागते.

त्याप्रमाणेच संसारात अनेक भोग भोगल्यानंतरच व त्यांद्वारे आयुष्याची चांगलीच घुसळण झाल्यानंतर मनुष्याचे उच्च अशा मनुष्यात रुपांतर होते अगदी त्याप्रमाणे. तोवर मनुष्याला देखील अनेक रूपांतून जावे लागते.

म्हणजे मनुष्य जेव्हा दुधाचे सेवन करतो तेव्हा त्यातील खरे सार असलेले लोणी हे बहुधा त्यातून अंती बाहेर पडते. परंतु जोवर त्याची निर्मिती होते तोवर त्याचे महत्व एवढे वाढलेले असते की समाजातील काही उच्च वर्णीयांना सोडून ते इतर वंचितांच्या केव्हाही मुखी लागत नाही. त्यामुळे अशी एखादी गोष्ट वा पदार्थ अस्तित्वात आहे हे देखील त्यांना कधीच ठाऊक होत नाही.

आणि म्हणूनच लोण्यासारख्या चविष्ट, गुणकारक आणि हितकारक पदार्थ सर्वांना खाता यावा आणि अशा या पदार्थापासून, किंबहुना अशा या मिष्टान्नापासून कोणीही वंचित राहू नये वा राहता कामा नये, उलट अनासाये ते सर्वांच्याच मुखी लागावे व एकदा का त्याची चव चाखली की पुढे ते वारंवार लाभावे अशी सर्वांच्या ठायी इच्छा निर्माण व्हावी व त्यासाठी पुढे मग सर्वानीच झटावे वा धडपड करावी अशी त्यामागील योजना असते.

म्हणजेच काय तर लोण्यासारख्या मिष्टान्नावर सर्वांचाच समान हक्क आहे हे दाखवण्यासाठी देखील व सर्व वंचितांना ते चाखता यावे यासाठी देखील चोरून का होईना दहीकाला नावाचा हा सर्व हट्टाहास उदयास आला. आणि तो आनंदाने भोगता यावा म्हणूनच तो मनोरंजक रीतीने साजरा केला जातो.

म्हणजे त्यात जर मनोरंजन नावाचा घटक नसेल तर कित्येक जण त्यात सहभागी होणार नाहीत व आपल्या खऱ्या हिताला पारखे होतील व आयुष्यातील सर्वोच्च आनंदाला देखील मुकतील.

म्हणजेच काय तर मनोरंजक पद्धतीने तो मांडला गेल्यास अधिकाधिक लोकं त्यात समाविष्ट होतील व सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल व त्यांच्या नकळतपणे का होईना ते उद्धरले देखील जातील ही त्यामागील भावना. (पहा देव किती कृपाळू-दयाळू आहे ते आणि जे मनोरंजनाला कमी लेखतात त्यांनी देखील हे लक्षात घ्यावे की त्यास किती महत्व आहे ते.)

म्हणजेच काय तर आनंद पदरी पाडून घेण्यासाठी आनंदी व खेळकर मार्गाने देखील मार्गक्रमण करता येते. क्लिष्ट आणि दुखदायी पद्धतच असावी लागते असे नाही. सोपा आणि सुलभ मार्ग देखील अवलंबिता येतो. ज्याप्रमाणे देवाला प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात साधा, सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे भक्तिमार्ग. असो.

भाग २:

तर अशा ह्या भूतलावर असे एक नाही तर अनेक काले आहेत. आणि केवळ आपणच नव्हे जगात इतरत्र देखील असे सण-समारंभ साजरे केले जातात, ज्यात लहानपणापासूनच बहुतेकजण त्यांच्या कळत नकळतपणेच जोडले गेले आहेत व अंती उद्धरले देखील गेले आहेत.

उदा. गणेशउत्सव. ज्याच्या कित्येकांना रोकडा अनुभव आला असून ह्यात लोकांना आनंद देखील एवढा मिळतो की ते ह्या सोहळ्याची मजा लुटण्यासाठीच पुढे येतात असे वाटते आणि केवळ मनोरंजनासाठीच तो उरला आहे असे देखील वाटते. परंतु असे कितीही असले तरीही अशाठिकाणी शुद्ध भावाची निर्मिती होतेच होते आणि अनेकांना न भूतो न भविष्यति अनुभूती लाभतेच लाभते. त्यामुळे कित्येकांच्या मते खरे उद्दिष्ट कितीही मागे पडल्यासारखे वाटत असले तरीही तसे होत नाही आणि निर्सागातील दैवी शक्ति देखील तसे घडू देत नाही.

त्याप्रमाणेच पंढपूरची वारी. जेथे नारायण जातीने सर्वासोबत चालत असतो व वारीतील पायी चालणाऱ्या प्रत्येकाला ह्या-न-त्या रूपात जातीने भेटत असतो व त्यांचे हित त्यांच्या पदरी घालत असतो.

तसेच नवरात्री उत्सव: ज्यामध्ये रात्र जागवून आणि नाचून-गाऊन आपण आईचे जागरण करत असतो व तिला देखील जागवत असतो व आपल्यासोबत सामील होण्यास आवाहन करत असतो, आग्रह धरत असतो आणि जशी रात्र चढत जाते तशी खऱ्या भक्तांच्या ठायी असलेला भाव देखील वाढत जातो आणि जेव्हा त्यास उधाणच येते तेव्हा आईला ती तेथे अवतरतेच व तेथे जमलेल्या इतर सर्वांवर देखील आपली कृपादृष्टी फेरून सर्वांनाच तिचा कृपाआशीर्वाद देऊ करते.

तसेच अमरनाथची यात्रा, जगन्नाथ पुरी रथयात्रा, तिरुपती बालाजी दर्शन, माताकी चौकी वगैरे अशी बरीच उदाहरणे आहेत. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र येतात आणि त्यांच्या येण्याने एक वातावरण निर्मिती होते. ज्यात शुद्ध भाव देखील मग मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो. जेणेकरून देवाला, म्हणजेच त्या ईश्वरी शक्तीला तेथे हजर व्हावेच लागते व उपस्थित सर्व जीवांना तारावेच लागते. ज्यामुळे नकळतपणे का होईना अभक्तांना देखील प्रचीती येऊन त्यांना देखील अशा ठिकाणी मग आगळावेगळाच आनंद लाभतो. ज्याच्याशी मग ते इतर कशाचीही तुलना करू शकत नाही व ज्याचा परिणाम होऊन ते देखील मग भक्तीमार्गाला लागतात.

एवढेच नव्हे तर जे कोणी अशा कार्यात सहभागी होत नाहीत त्यांन मग तेथील उपस्थित लोकांचे अनुभव ऐकून व पाहून अशा महोत्सवांची ओढ वाटू लागते. ज्यामुळे अशा कार्यक्रमांत बहुधा प्रत्येक वर्षी गर्दी वाढतच जाते व देवावरील सर्वांचा विश्वास देखील मग वृद्धिंगत होत जातो वा तसे होण्यास मदतच होते.

भाग ३:

आता आपण प्रचलित अर्थाकडे वळूयात...

पहिल्या भागात आपण भूतकाला ह्या शब्दाचा अर्थ पाहिला. म्हणजेच भूत आणि काला या शब्दाचा अर्थ पाहिला. भूत म्हणजे मनुष्यप्राणी, देहात असलेला किंवा नसलेला. आणि काला करणे म्हणजे एकत्र येणे किंवा एकत्रित जमणे. सर्व भूतांना एका जागी एकत्र आणून त्यांचे हित त्यांच्या पदरी घालणे व त्यांचा उद्धार करणे.

परंतु भूतकोला या शब्दाचा प्रचलित अर्थ लक्षात घेतला असता त्यातील कोला या शब्दाचा अर्थ म्हणजे नृत्य. म्हणजे भूतकोला ह्या शब्दाचा कन्नड भाषेतील अर्थ घ्यायचा ठरवल्यास तो असा होतो. एका भुताचा नृत्यप्रकार किंवा एका भुताचे नृत्य. आणि भूत हा शब्द बहुधा मृत जीवांना अधिक वापरतात म्हणून जरा काल्पनिक परंतु उग्र व भीतीदायक स्वरूप धारण करून सादर केलेले एका भुताचे वा मनुष्य रूपातील एका भूताचे नृत्य. कारण लोकं देवापेक्षा भूतानांच अधिक भितात हेही कारण त्यामागे आहे.

आणि हे सर्व कशासाठी? तर तेथे जमलेल्या सर्व लोकांच्या मनातील वाईट वृत्तीला आळा बसेल व ते ह्या स्वरूपाला भिऊन वा त्यास घाबरून त्यांच्या विघातक विचारांचा त्याग करतील व इतर भूतांचे अहित चिंतणार नाहीत, त्यांचा घात करणार नाहीत, ही त्यामागील भावना.

श्रीहरिचा नरसिंह अवतार देखील हेच सांगतो. तो याहून कितीतरी अधिक पटीने भयानक होता. ज्यामुळे केवळ हिरण्यकश्यपुच नव्हे तर भक्त प्रल्हाद देखील अतिशय घाबराघुबरा झाला व थरथर कापू लागला.

तर दुसरीकडे गीतेत सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने जेव्हा देवाचे विराट स्वरूप पाहिले तेव्हा तो देखील असाच भयभीत झाला. कारण तेदेखील कमालीचे भयंकर होते जे पाहून त्याने आपले डोळेच घट्ट मिटून घेतले. परंतु दिव्यदृष्टि लाभल्याने त्याला बंद डोळ्यांनी देखील जसे उघड्या डोळ्यांना दिसते तसेच सर्वकाही तसेच्या तसे दिसत होते. तेव्हा त्याने लागलीच देवाची क्षमा मागून त्वरित हे रूप सोडावे व आपले मनुष्य देहातील सगुण-साजिरे रूप पुन्हा एकदा धारण करावे अशी विनवणी केली. परंतु देव अद्याप ऐकत नाही हे पाहून तो देवाची क्षमायाचनाच करू लागला.

माउली तर म्हणतात देवाचे असे ते भयानक स्वरूप पाहून अर्जुन म्हणतो की हे नारायणा तुमचे एवढे भयंकर रूप पाहून जणूकाही काळच लोटला आहे आणि माझ्यासकट आता ह्या संपूर्ण ब्रह्मांडांचाच एका क्षणात घास घेईल की काय असेच माझ्या जीवाला झाले आहे. माझे हृदय देखील त्यामुळे अतिशय जलद गतीने धडधडत आहे. त्यामुळे तुम्ही त्वरेने हे स्वरूप सांडून माझ्यावर कृपा करावीत व मजवर दया दाखवावीत अशी तो देवाची याचनाच करू लागतो.

आणि म्हणूनच एरव्हीही कोणत्याही देवाच्या मूर्तीला वा देवाच्या बाहेरील मुखवट्याला भले मोठे डोळे लावून त्याचा चेहऱ्यावरील भाव देखील उग्र ठेवतात जेणेकरून काळालाही आपला काळ लोटला आहे असे वाटावयास हवे.

म्हणजेच काय तर सर्वांच्याच ठायी असलेल्या वाईट शक्तींना चांगलाच आळा बसावा व केवळ वाईटच नव्हे तर निषिद्ध कर्मे करण्यापासून देखील ते परावृत्त व्हावेत हे त्यामागील कारण. असो.

तेव्हा कांतारा सिनेमात प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जरी एखादा मनुष्य नाचत असला तरीही त्याच्या देहात त्यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास दैवाने संचार केलेला आहे. मराठी भाषेत दैव म्हणजे प्रारब्ध/नशीब. परंतु कन्नड भाषेतील अर्थ घ्यायचा झाल्यास दैव म्हणजे देव/ईश्वरी शक्ति. आणि तेथे चार ईश्वरी शक्ति वास करत आहेत. त्यापैकी पंजुर्ली नामक ईश्वरी शक्ति अशा या थोड्याफार उग्र स्वरूप धारण केलेल्या देहात संचारली आहे व तेथे जमलेल्या लोकांचे प्रश्न सोडवते आहे.

म्हणजे पाहू जाता देवच मनुष्य रुपात येऊन नाचत-गात आहे व आपल्या भक्तांचे मनोरंजन करत आहे व त्यांसोबत त्यांचे रक्षण देखील करत आहे व त्यांचे प्रश्न देखील सोडवत आहे.

कारण सर्व संतांनी सांगितल्याप्रमाणे देवाचे हे कामच आहे. किंबहुना त्याचे हे एकमेव कर्तव्यच आहे. तुकोबा तर म्हणतात श्रीहरि नित्य एकमेवच काम करतो आणि ते म्हणजे दुर्जानांपासून आणि इतर संकटांपासून भक्तांचे रक्षण करणे...

भक्त राखे पायांपासी | दुर्जनांसी संहारी...

म्हणजेच काय तर ज्यास रंग, रूप, आकार असे काहीही नाही असा देवच मग नावारूपाला येऊन वा दुसऱ्याच्या देहात शिरून व आपल्यासोबत इतर सर्व भूतांना जमा करून, किंबहुना त्यांच्यात मिळून-मिसळून त्यांचे मनोरंजन देखील करत आहे आणि त्यांचे संरक्षण देखील करत आहे.

तेव्हा आता आपण सिनेमाच्या कथानकेकडे वळूयात. त्यात दाखवल्या प्रमाणे ह्या भूतकोल्यात देखील एका दैवी शक्तीला आवाहन करण्यासाठी सगळे एकत्र जमले आहे व त्यासाठी एका पवित्र देहाची(मनुष्याची) निवड केली आहे. कारण अशा मनुष्याच्या देहासकट त्याच्या ठायी असलेला भाव देखील शुद्ध असणे तितकेच गरजेचे आहे व असते. कारण अमृत ओतण्यास घेतलेले एखादे भांड वा पात्र देखील तेवढेच स्वच्छ लागते, येथे देखील अगदी तोच न्याय आहे.

म्हणजेच दैव वा देव अवतरण्यासाठी ज्या मनुष्याची येथे निवड होते तो देखील अतिशय पवित्र मनाचा आणि देहाचा असणे तितकेच गरजेचे आहे व असते. परंतु तसे जर नसेल तर सत्कर्मे वा परोपकारी कर्मे आचरून त्याचे शुद्धीकरण होणे गरजेचे असते.

आणि म्हणूनच सिनेमाचा नायक ज्याने याआधी बोलू नये ती सर्व निषिद्धे कर्मे आचरली असतात व खाऊ नये अशा प्रत्यके गोष्टीचे सेवन केलेले असते त्यामुळे त्याचा देह हा विटाळ आणि अपवित्र झालेला असतो. परंतु अंती जेव्हा तो सुधारतो व पूर्वी आपण केलेल्या आपल्या वाईट कृत्यांची त्यास लाज वाटून त्यावर पश्चाताप व्यक्त करतो आणि प्रायश्चित घेण्यास लागलीच तत्पर असतो, किंबहुना एका क्षणाचाही विलंब न लावता ते घेण्यास सुरुवातच करतो व त्यासाठी आपला प्राण पणाला लावून त्यापायी अंती आपला जीव देखील गमावतो व देहत्यागच करतो, तेव्हाच त्याचा देह मनासकट शुद्ध होतो व अशा शुद्ध झालेल्या देहातच मग अंती देव अवरतो.

तोवर गेहुआ नामक मनुष्याच्या अंगी अशी ही शक्ती अवतरत असते आणि स्वतःच नाचून-गाऊन तेथे जमलेल्या इतर भूतांचे मनोरंजन करते व त्यांचे प्रश्न सोडवते.

परंतु ह्या शक्तीचे मुख्य कार्य आणि उद्दिष्ट म्हणजे तेथील स्थानिक लोकं ज्या जमिनीवर राहतात त्याचे रक्षण करणे. ती कोणी हिसकावून घेणार नाही वा त्यावर कोणी आपला मालकी हक्क सांगून ती बळकावणार नाही याची खबरदारी घेणे. कारण हे करण्यासाठीच खरेतर त्या दैवी शक्तीने रूप व आकार धारण केलेले आहे. म्हणजेच तीचा अवतारच ह्या कारणासाठी झालेला आहे. आणि अशा त्या अवताराला शुकराचे म्हणजेच वराहाचे, डुकराचे चिन्ह देण्यात आलेले आहे.

त्याचे कारण असे की पूर्वी ह्याच कारणासाठी खुद्द श्रीहरिने देखील अवतार घेतलेला आहे ज्याची सांगड सिनेमात घातली गेली आहे. जो श्रीहरिच्या दहा अवतरांपैकी एक गणला जातो. ज्यास आपण वराह अवतार म्हणून ओळखतो.

आणि म्हणूनच सिनेमातील नायकाची आई नायकाला डुकराची शिकार करण्यासाठी वारंवार मज्जाव करत असते. म्हणजे जो आपला व आल्या जमिनीचा खरा रक्षणकर्ता आहे तुम्ही त्याचीच शिकार करत असून त्याच्याच जीवावर उठले आहात असे तिला सुचवायचे आहे. एवढेच नव्हे तर सिनेमामधील त्या जमिनीची रक्षा करण्यास नेमलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव देखील मुरली असेच आहे, जे श्रीहरिच्याच अनेक नामांपैकी एक आहे. आणि नायकाचे नाव देखील शिवा का आहे हे देखील शेवटास जाऊन तुम्हां सर्वांना कळेल.

तेव्हा पुराणांचा दाखला घेऊन तुम्ही पाहिलेत तर तुम्हांला एक गोष्ट कळून येईल की एखाद्याचे राज्य, व त्याची सत्ता, म्हणजेच त्याची जमीन, जुमला, मालमत्ता त्यांस परत मिळवून देण्यासाठी पूर्वी श्रीहरिने शुकर/वराह अवतार धारण केला होता.

आणि एवढेच नव्हे तर जेव्हाकेव्हा देवाच्या अमलाखाली असलेले एखादे राज्य, जमीनजुमला कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देखील देव स्वतः जातीने तिच्या रक्षणार्थ अवतार घेतो वा नावारुपाला येतो व त्याचे रक्षण करतो.

परंतु पाहू जाता एरव्हीही सर्वकाही एका देवाच्याच मालकीचे असते, नित्य त्याच्या एकाच्याच अमलाखाली आहे. किंबहुना सर्वकाही त्याचेच असून सर्वत्र त्याची एकाचीच सत्ता आहे आणि चालते. मनुष्याच्या स्वतःच्या मालकीचे वा आपले म्हणण्यासारखे येथे असे काहीही नाही. असो.

तेव्हा आपण श्रीहरिचा शूकर अवतार पाहूयात.

तुकोबा अभंगात म्हणतात...

🌻🌿🌻🌿

हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें

बळी शंकराच्या ।।

इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी

म्हणती धांव ।।

तई पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती

मारीयेले ।।

तुका म्हणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली

पांडुरंगा ।।

🌻🌿🌻🌿

तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा हिरण्याक्ष दैत्य शंकराच्या वरदानाने बळिवंत होऊन मातला व आपण आता मृत्यूवरच विजय मिळवून अजिंक्य झालो आहोत ह्या जाणीवेने शेफारून गेला, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून त्याने सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली.

आणि पुढे मातून जाऊन त्याने स्वर्गातील देवांना देखील वेठीस धरले आणि इंद्राच्या अधिपत्याखाली असलेला स्वर्ग देखील त्याने हिसकावून घेतला व त्याचे राज्य व पद देखील हिरावून घेतले. जे त्यास देवानेच म्हणजेच श्रीहरि नारायणानेच देऊ केलेले होते. त्यामुळे त्याचे रक्षण करणे हे पर्यायाने मग श्रीहरिचे कर्तव्य बनून गेलेले होते.

तेव्हा अशारितीने स्वर्गावर आपले अधिपत्य प्रस्थापित करून जेव्हा दैत्य हिरण्याक्ष त्यावर सत्ता करू लागला, म्हणजेच स्वर्गाला आपल्या टाचेखाली घेऊन जेव्हा त्यावर तो राज्य करू लागला, तेव्हा स्वर्गातील सर्व देवांनी मिळून श्रीहरिच्या नामाचा धावा सुरू केला व त्यालाच गळ घालण्यास सुरुवात केली.

ते म्हणू लागले ‘हे देवा चक्रपाणी, हे श्रीहरि आता तुम्हीच धावून यावेत व यातून आम्हांला सोडवावे व आमचे देखील रक्षण करून आमचे राज्य, आमचा स्वर्ग आम्हाला परत मिळवून द्यावात’.

तेव्हा तुकोबा श्रीहरिला उद्देशून म्हणतात आणि जेव्हा देवांनी तुझ्यापाशी अशी करुणा भाकली तेव्हा हे पांडुरंगा, हे श्रीहरि तुम्हांस देव असलेल्या इंद्राची देखील दया आली आणि लागलीच तुम्ही शुकराचे(डुक्कराचे) रूप घेऊन, म्हणजेच वराहरूप धारण करून त्याच्या मदतीला धावून गेलात. व दैत्यांच्या पती/नायक असलेल्या दैत्य हिरण्याक्षाला मारून त्याचा वध केलात आणि देवांना त्यांचा स्वर्ग परत मिळवून दिलात, त्यांचे राज्य पुन्हा एकदा मोकळे करून दिलेत.

तुकोबाराय देवाला उद्देशून म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे विठाई अशारितीने ज्यांची राज्ये त्यांना परत मिळवून देणारी तू माउली असून तुझ्या भक्तांची तू खऱ्या अर्थांने साउलीच आहेस. अखंड त्यांच्या पाठीशी असणारी व त्यांच्या मागेमागे हिंडणारी त्यांची आईच आहेस, त्यांची जननी आहेस, त्यांची माय आहेस.

कारण शरण आलेल्यांचे किंबहुना तुझ्या पायाशी आलेल्या प्रत्येकाचे तू हमखास रक्षण करतेस, त्यांना संरक्षण प्रदान करतेस व संकटमुक्त करून पुढे सुखी आयुष्य देखील देऊ करतेस व त्यांना देऊ केलेल्या दानात काही अडसर येणार नाही वा त्यावर कोणाची वाकडी/करडी नजर पडणार नाही याची देखील काळजी वाहतेस.

अशारितीने तू भक्तांचे, त्यांच्या तुझ्यावरच्या भक्तीचे व त्यांना देऊ केलेल्या कृपादानाचे देखील सर्वार्थाने रक्षण करतेस.

अभंग ३३५

तेव्हा ही कथा वाचून वाचकांना हेदेखील कळेल की ज्याप्रमाणे दैत्य हिरण्याक्ष भगवान शंकराच्या वरदानाने मातून जातो व त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःला हवे असलेले वरदान पदरी पाडून घेतो, परंतु पुढे स्वतःच्या स्वार्थासाठी व इतरांच्या घातासाठीहच त्याचा वापर करतो व पुढे देवांवरच उलटतो, त्याप्रमाणेच सिनेमातील खलनायक देखील शिवा नामक नायकाच्या बळावरच माजतो आणि त्याचा भोळाभाबडा स्वभाव लक्षात घेऊन आणि त्याच्या अंगी असलेले अपार बळ व शक्ति ओळखून त्याच्याठायी असलेली ही गुणवैशिष्ट्ये स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी वापरतो, परंतु इतरांचा मात्र घातच चिंतितो व शेवटी त्याच्याच माणसांवर उलटतो.

म्हणजेच काय तर श्रीहरिचाच भक्त असलेल्या भगवान श्री शंकराच्याच वरदानाने दैत्य हिरण्याक्ष माजतो आणि श्रीहरिचीच कृपादृष्टि असलेल्या त्याच्या भक्तांवर आपला माज दाखवतो. परंतु भक्त कितीही भोळे असले तरीही श्रीहरि मात्र तेवढेच चतुर आहेत ह्याचा दुर्जनांना मात्र विसर पडतो आणि नको त्या फंदात ते स्वतःला गोवतात व अंती स्वतःचाच घात ओढवतात. परंतु श्रीहरिची वेळोवेळी चतुराई पाहून तुकोबा तर त्यांस नेहमी सर्व चतुरांचा शिरोमणीच म्हणून संबोधितात. असो.

म्हणजेच काय तर दोन्हीही ठिकाणी असे हे दैत्य/दानववृत्ती भोळ्या-भाबड्या माणसाच्या स्वभावामुळेच शेफारून जातात व त्यांच्या जीवावरच आपली सत्ता पसरवतात. म्हणजेच भगवान शंकर जेवढे भोळे आहेत त्याप्रमाणेच सिनेमातील नायक देखील अतिशय सरळ-साधा असून खलनायकाच्या वरपांग स्वभावाला भुलतो व वेळोवेळी त्यांचे कौतुक वाटून त्यांच्या अधिकाधिक अधीन जातो. त्यांचा मानस नेमका काय आहे हे त्यास केव्हाही कळत नाही व दिवसेंदिवस नेटाने त्यांची सेवा करतच राहतो.

परंतु देव देखील वारंवार त्याच्या स्वप्नात येऊन त्यास दृष्टांत देत राहतात. एवढेच नव्हे तर जागेपणी देखील ह्या-न-त्या मार्गाने त्यास सूचित करत राहतात व त्यास सावध करत राहतात. परंतु योग्य वेळ येईपर्यंत त्याला देखील ह्या सर्वाचा उलगडा होत नाही.

परंतु जेव्हा त्यास ह्या सर्वाचा उलगडा होतो तेव्हा तो किंचितही वेळ न दवडता आपली चूक मान्य करून ती सुधारण्यास सुरुवात करतो. व त्यासाठी आपल्या प्राणाची देखील पर्वा करत नाही किंबहुना त्यापायी आपले प्राणच वेचतो व अंती ते गमावतो देखील.

परंतु त्यामुळेच त्याच्या मनाचे आणि देहाचे शुद्धीकरण घडून येते व त्याचा पवित्र देह उपलब्ध होऊन देवाला अवतार घेण्यास सुलभ होते.

आणि म्हणूनच अशा सोहळ्याला भूतांचे विशेषण लावलेले आहे. जेथे केवळ जिवंतच नव्हे तर मेलेले जीव देखील जमू शकतात व आपला उद्धार घडवून आणू शकतात.

आणि मुख्य म्हणजे मृत जीवांना जसा देह नसतो, म्हणजेच रंग, रूप, आकार असे काहीही नसते त्याप्रमाणेच देवाला देखील स्वभावतःच देह नसतो आणि व्यक्त होण्यासाठी तो देखील एकतर नवीन देह धारण करतो व नावारूपाला येतो. नाहीतर कोणा दुसऱ्याच्या देहात शिरून आकार धरतो. व येथील सर्व जीवांमध्ये तो श्रेष्ठ असल्यामुळे त्यालाच संतांनी सर्वात मोठे भूत म्हंटले आहे. असो.

आणि म्हणूनच एखादा भूतसोहळा म्हंटले की तेथे देहात असलेले आणि नसलेले असे सगळेच जीव एकत्र येतात वा जमतात. आणि म्हणूनच देहत्यागानंतरही सिनेमाचा नायक शिवाला आपला उद्धार घडवून आणणे शक्य होते. किंबहुना देव स्वतः येऊन त्याचा उद्धार करतात व अंती त्यास आपल्यासोबत घेऊन देखील जातात आणि म्हणूनच नायक शिवा अंती अचानक नाहीसा होतो.

आपण गजेंद्र नावाच्या हत्तीची., गणिकेची तसेच अजामेळची गोष्ट या येथेच वाचली आहे. ज्यांनी अंतकाळी देवाचा धावा केला आणि श्रीहरिने जातीने येऊन त्यांचा उद्धार केला व देहत्यागानंतर लागलीच तो त्यांना आपल्या सोबत वैंकुठास देखील घेऊन गेला.

म्हणून तुकोबा म्हणतात...

मरणाचे वेळी करी तळमळ । आठवी कृपाळ

तये वेळी ।।

अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा । तुका म्हणे सुखा

पार नाही ।।

आपला अंतकाळ जवळ आला आहे हे ओळखून तळमळत असताना देखील ज्याच्या मुखी देवाचे नाम येते त्याच्या पुढील सुखाला मग पारच राहत नाही. म्हणजेच ज्यावेळी साहजिकच कशाचेही स्मरण राहत नाही किंबहुना इतर सर्वाचा आपसूकच विसर पडतो अशा निर्णायक समयी वा काळी ज्या कोणाच्या मुखी कृपाळू अशा श्रीहरि नाव येते त्याचे भाग्य थोर आहे असेच म्हणावे लागते. कारण अंतकाळ जवळ आला असताना जो कोणी श्रीहरिचा धावा करतो अशांसाठी देव नेहमी तातडीने धावून जातो व त्याचा केवळ उद्धारच करत नाही तर त्यास स्वतः सोबत वैकुंठाला घेऊन देखील जातो.

म्हणजेच काय तर मृत जीवांचा देखील उद्धार करणे हे केवळ परब्रह्म असलेल्या श्रीहरिचेच काम असून एका त्यालाच ते शक्य आहे. त्यामुळे या भूतलावर जे जे श्रीहरिचे अवतार आहेत तेच अशा मृत जीवांचे उद्धार करू शकतात. आणि म्हणूनच परब्रह्म जेथे स्वतः अवतार घेतो त्यास भेटावयास गेलेले जीव देखील येतात. त्यांना तेथे येण्यास कोणीही मज्जाव करू शकत नाही.

परंतु समाजातील इतर गुरु वा साधक तसे करू शकत नाही. कारण तसे करण्यास मनुष्याच्या ठायी पुरेसे बळ देखील नाही आणि त्यास तेवढा अधिकार देखील नाही.

आणि म्हणूनच श्रीहरिचाच अवतार असलेले स्वामी समर्थांचे देखील जेथेजेथे वास्तव्य आहे वा मठ आहेत तेथे अजूनही जिवंत लोकांसोबत मेलेली भूतं देखील जमा होतात व स्वतःच्या उद्धाराची याचना करतात.