संदर्भ
मोडके तोंडके का होईना आजकाल सर्वचजण तुकोबांच्या अभंगांचे अर्थ सांगू लागले आहेत. त्यावर टिपणी विशेष लिहू लागले आहेत. परंतु अभंगांचे केवळ अर्थ सांगणे आणि तेही बहुधा अनुभव आणि भावरहित, ह्यामुळे तुकोबांची गाथा ही गाथा न राहता त्याचे मुख्य उद्दिष्टच बदलून जाते. व त्यासोबत रसिक वाचकांचा व श्रोत्यांचा रस देखील हळूहळू लोप पावत जातो.
परंतु अशा नैतिक गोष्टीचे भान न राखता केवळ स्वप्रसिद्धीसाठी कींवा आपणास किती ज्ञान आहे हे दर्शवण्यासाठी आणि त्यातून स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी असे निरर्थक प्रयत्न केले जातात आणि सामाजिक बांधिलकी नावाचा सर्व प्रकारच मोडीत काढला जातो.
परंतु आपल्या अशा करण्याने लोकांची दिशाभूल होऊ शकते, त्यांचे अध्यात्माच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट पण त्याने लांबणीवर पडू शकते ह्यावर त्यांचे दुर्लक्ष होते.
परंतु अशा कर्माला देखील दोषयुक्त कर्म म्हंटलेले असून त्याचे ताबडतोब भोग भोगण्यास त्यांच्या वाट्याला येतात. परंतु अशी नटद्रष्ट लोकं त्याकडे देखील दुर्लक्ष करून स्वतःसोबत इतरांचे व त्यांच्या जिज्ञासाचे देखील वाटोळे करतात. असो.
तेव्हा आपण गाथा म्हणजे काय हे जाणून घेऊन तुकोबांची जीवन गाथा कशी होती ते आता मनोरंजक पद्धतीने पाहणार आहोत.

आणि म्हणूनच आम्ही यास केवळ तुकोबांचे अभंग असे न म्हणतात संदर्भासंहित तुकोबांचे अभंग असे म्हंटले असून तेच आम्ही या प्रकल्पातून आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहोत. त्यात केवळ अभंगांचे अर्थच नव्हे तर विशिष्ट अभंग का व कोणत्या कारणामुळे रचला गेला अथवा त्यांच्या मुखातून निघाला व त्यापुढील अभंग का व कोणता असेल हे देखील तुम्हाला आता सहज कळेल.
त्यामुळे या अभंगांना अधिकच रस प्राप्त होणार असून आपणास यापुढे प्रत्येक अभंग वेगळा न वाटता एकाच माळेचे मणी किंवा एका चालू कथेची पुढील ओळ किंवा परिच्छेद आहे असे वाटून जाईल. आणि जिज्ञासू वाचकास यासर्वातून समाधान देखील मिळवून देईल.
आणि हे सर्व आम्हाला शक्य झाले ते आम्ही घेतलेल्या १५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर. ज्यामुळे ते वाचताना आपण एखाद्या गोष्टीचे याची देही याची डोळा साक्षीदार होत आहोत याचा अनुभती देखील लाभेल. व त्यासोबत एरव्ही कधीही वाचलेच गेले नसते असे अभंग आपल्या भेटीस आले आहेत व आपण देखील प्रत्यक्षात वाचून ते संपविले याचा अद्वितीय असा आनंद मिळवून देईल.
एवढेच नव्हे तर, तर त्यासोबत, अध्यात्म म्हणजे काय, स्वहित कसे साधावे, परमार्थ का करावा, मुक्ती व मोक्ष यात नेमके अंतर काय अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे सापडून त्याचे रोकडे, अस्सल ज्ञान देखील (authentic knowledge) मिळाल्याशिवाय राहणार नाही.
निष्कर्ष
Abhangas are nothing but the short verses uttered by Saint Tukaram that came to him spontaneously from time to time when he filled with the love, gratitude, or overwhelming emotions towards Lord Vithhal and on the other hand to express the emotions such as compassion, love or rage towards the entire world seeing its so called peculiar behavior to make it a point or to educate the people around to raise their level and standard of living so that they could benefit them in long run.