संदर्भ
जे माणसामाणसांत भेदाभेद करतात त्यांना उद्देशून...
Anja Rožen, a 13-year-old girl from Ravne na Koroškem, Slovenia, has a vision of what peace looks like. Anja brought that vision to life through her art, earning her the grand prize in the Lions Clubs International Peace Poster Contest.
हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की तुकोबांनी आपल्या अभंगात हे आधीच सांगून ठेवले आहे किंबहुना देवानेच हा न्यायनिवाडा खूप पूर्वी करून ठेवला आहे आणि म्हणूनच कोणीही दोन भिन्न व्यक्तींमध्ये केव्हाही भेदाभेद करू नये असा संदेश दिला आहे. तो खालील प्रमाणे आहे.
------------
अवघी एकाचीच वीण । तेथे कैचे भिन्नाभिन्न ।
वेदपुरुष नारायण । तेणे केला निवाडा ।।
------------
त्या चित्रात काय दाखवले आहे की दोन हात विणकाम करताय आणि ते विणकाम सर्व धागेदोरे-रुपी माणसांनी भरले आहे आणि सर्व मिळून शेवटी त्यातून एकच कापड तयार होते.
तुकोबा वरील अभंगात देखील तेच सांगत आहेत. किंबहुना देवानेच हे सांगून ठेवले आहे असा संदेश देत आहेत.म्हणजे आपण सर्व एकाच विणकामाचे भाग असून किंवा भाग असल्याने आपल्यात तत्त्वतःही भिन्नता कशी असेल? भेद कसा असेल? आणि हे मी सांगत नसून वेदपुरुष असलेल्या नारायणाने हे आधीच सांगून ठेवले आहे. किंबहुना त्यानेच खूप पूर्वी हा न्याय/निवाडा करून ठेवला आहे.
अभंग २०८
निष्कर्ष
आणि म्हणूनच संतजन म्हणतात की येथे जे काही चिरकाल टिकणारे आहे ते सर्व सत्य असून सुखदायीदेखील आहे, ज्यास केव्हाही कसलेही मोल द्यावे लागत नसून वर तेच जीवनाचे खरे सार देखील आहे.
आणि त्याउलट जे काही नाशिवंत आणि क्षणिक आहे ते सर्व खोटे असून वर दुःखदायक देखील आहे आणि वर मनुष्याला अधोगतीला नेणारे देखील आहे किंबहुना नेतेच.
आणि त्याउलट जे काही नाशिवंत आणि क्षणिक आहे ते सर्व खोटे असून वर दुःखदायक देखील आहे आणि वर मनुष्याला अधोगतीला नेणारे देखील आहे किंबहुना नेतेच.