स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिले होते वेठी ।झालिया सेवटीं । जागे लटिके
सकळ ।।
वाया भाकीली करुणा । मूळ पावावया सिणा ।राव रंक राणा । कैचे स्थानावर
आहे ।।
सोसिलें ते अंगे । खरे होता नव्हता जागे ।अनुभवही सांगे । दुःखे डोळे
उघडिले ।।
तुका म्हणे संती । सावचित केले अंती ।नाही तरी होती । टाळी बैसोनिया
राहिली ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!