पूज्या एकासनी आसनी आसन । बैसता गमन
मातेशी ते ।।
सांगतो ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित
व्हावे तरी ।।
संता ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीच वळसा
सापडला ।।
तुका म्हणे एका एकी वरासन । दुजे तेथे भिन्न
अशुभ ते ।।
अधर्म करू नये, त्याने अहितच साधले जाते, पाप पदरी येते, नरक जोडला जातो.. आणि देव अंतरतो
Comments
No comments yet. Be the first to comment!