Welcome to the world of infinite knowledge called

श्री तुकाराम गाथा

सूचना:

रसिकांना, वाचकांना व अभंगांप्रति उत्सुकता असलेल्या सर्वच पंडित व श्रोत्यांना विनंती आहे की आपण ही गाथा हळुवारपणे व शांतचित्ताने वाचावी. जेणेकरून शांतरसात लिहिलेल्या ह्यातील कथा व लेख त्याच रसात ग्रहण केल्या जातील व त्यासोबत त्यातील गाभ्यात हळुवारपणे प्रवेशदेखील करता येईल.

एवढेच नव्हे तर, त्यात लिहिलेले प्रत्येक अभंग व त्यांचा अर्थ यांचा रस घेता येईल आणि त्यातील दडलले वर्म देखील हळूहळू हाती लागेल. तेव्हा कोठे जाऊन आमचे कार्य आणि त्याप्रति असलेला आमचा हट्टाहास सार्थकी लागला असे म्हणता येईल.

तसेच, वाचकांना ही देखील विनंती आहे की वाचून झाल्यावर थोडे कष्ट जरी झाले तरीदेखील हयाविषयीची प्रतिक्रिया सर्वांनी comment section मध्ये जरूर कळवावी. जेणेकरून आम्हाला देखील कामातून लाभत असलेल्या समाधानाचा आनंद लुटता येईल व आमची पाऊले योग्य त्या दिशेनेच पडत असून उजू दिशेकडेच आमचे मार्गक्रमण सुरू आहे याचि देखील आम्हांस शाश्वती येईल. आणि मुख्य म्हणजे त्यानिमित्ताने पुढील लेखात सुधारणा करण्यास देखील त्यांचा हातभार लाभेल.

तेव्हा शुभस्य शीघ्र्म...

आजचा अभंग

(संदर्भ: देवाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या तुकोबांची व्यथा...)

कान्हया रे जगजेठी । देई भेटी

एक वेळे ।।

काय मोकलिले वनी । सावजांनी

वेढिलें ।।

येथवरी होता संग । अंगे अंग

लपविले ।।

तुका म्हणे पाहिले मागे । एवढ्या वेगीं

अंतरला ।।

तुकाराम महाराज म्हणतात हे कान्हा, हे जगजेठी आता कृपा करून यापुढे तरी उशीर लावू नकोस, विलंब करू नकोस, त्वरेने धावत ये आणि मला भेटी दे, आता तरी मला तुझ्या चरणकमळांचे दर्शन घडू देत. तुझ्या सुकुमार आणि गोजिऱ्या पायांना डोळे भरून पाहू देत. 

ते म्हणतात आता यापुढे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझ्यावाचून एकक्षण देखील जगू शकत नाही, तेव्हा किमान एकवेळ तरी मला येऊन आलिंगन दे आणि या डोळ्यांना तुझे श्रीमुख दाखव. आणि असे करून मला या संसार-पाशातून तू एकदाचे मुक्त कर.

कारण ते म्हणतात तू मला या संसाररूपी वनात टाकून काय दिलेस, काहीकाळ एकटे काय सोडलेस, लागलीच मी या संसाराच्या अधीन गेलो आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार रुपी सावजांनी मला वेढले आणि माझा घातच ओढवला.

म्हणजे मी तुला अंतर काय दिले, मी लागलीच या संसाराला शरण गेलो आणि पुनःरूपी पूर्वी सारखा वागू लागलो, नको-नको ती कर्मे आचरू लागलो, करू नये तेच नेमके करू लागलो आणि पुनः या प्रपंचाच्या आहारी जाऊ लागलो.

तुकोबा म्हणतात जोवर तू माझ्या संगतीला होतास, माझ्या सोबत होतास, म्हणजेच जोवर तुझे नाम माझ्या मुखी होते, माझ्या कंठी होते, तोवर मी आणि तू एकच होतो, एकरूप होतो, तुझ्या अंगी मी माझ्या स्वतःला लपवून होतो. आणि मला तुझा अखंड अंगसंग देखील लाभला होता.

परंतु तुझे नाम माझ्या मुखातून काय सुटले वा निसटले, मी क्षणांत तुझ्यापासून लांब झालो आणि दूर फेकलो गेलो. आणि तू देखील माझ्यापासून फारकत घेतलीस आणि मला स्वतःपासून वेगळे होऊ दिलेस आणि आपला अंगसंग तुटला.

आणि एवढेच नव्हे तर थोड्याच अवधीत तू मला एवढया वेगाने अंतरलास की मी जेव्हा सहजच वळून मागे पाहिले तेव्हा तू दिसेनासाच झालास, कोठे सापडेनासाच झालास. तू मला इतक्या वेगाने अंतरलास की तुझ्या असण्याच्या खुणा देखील आता नाहीशा झाल्या आहेत.

लेख/निबंध/अभंग (विनंतीवरून)

वाचकांच्या विनंती वरून खालील लेखन करण्यात आलेले आहे:

प्रकार नाव संदर्भ
लेख ध्यान धारणा कशी करतात? ज्ञानेश्वरी
लेख प्रणव हा शब्द पुराणांमध्ये खूपवेळा वापरला जातो. त्याचा नेमका अर्थ काय आहे? ज्ञानेश्वरी
निबंध रेडा वेद म्हणाला असे पुराणकाळात म्हटले जायचे त्याला विज्ञानाचा काही आधार आहे का? गाथा व ज्ञानेश्वरी
अभंग भक्ती का करावी?-कारण-१-प्रारब्ध: गाथा
अभंग भक्ती का करावी?-कारण-२: हीन आयुष्य: गाथा
निबंध रेडा वेद म्हणाला असे पुराणकाळात म्हटले जायचे त्याला विज्ञानाचा काही आधार आहे का? गाथा व ज्ञानेश्वरी
निबंध अध्यात्म आणि विज्ञान यामधील फरक कसा समजावून सांगाल? गाथा व ज्ञानेश्वरी
निबंध मनुष्य जन्माला का येतो? मनुष्य जन्माला येण्यामागचे मूळ कारण कोणते? गाथा व ज्ञानेश्वरी

Subscribe to Our Newsletter